कोल्हापूर- आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस आजार झालेल्या रुग्णाचा ( Kolhapur Reports first GBS patient death) पहिला मृत्यू झाला. चंदगड तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू जीबीएस आजारानं झाल्यानं आरोग्य यंत्रण सतर्क झाली आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील ६० वर्षीय महिला सीबी सेंट्रल बाधित आजारामुळे कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या वृद्धेवर उपचार केले. मात्र, आज सकाळी महिलेचा मृत्यू झाला.
माहिती देताना वैद्यकीय अधिकारी (ETV Bharat Reporter) अतिदक्षता विभागात ६० बेडची व्यवस्था-पुण्यात जीबीएस रुग्णांचे प्रमाण (GBS Maharashtra outbreak updates) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सीपीआर रुग्णालयाला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी केलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ८ रुग्णांवर उपचार सुरू-गेल्या वर्षभरात जीबीएस आजारांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे आहे. मात्र, यंदा पुण्यात या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यानं या आजाराचा धोका वाढला आहे. सध्या, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिनाराजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आठ जणांवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यामध्ये पाच रुग्ण प्रौढ तर तीन बालक आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता रोजच्या आहारात शिळे अन्न टाळावे आणि पाणी उकळून प्यावे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, अशाच अन्नाचं सेवन करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
काय आहे जीबीएस आजाराचे अपडेट?
- आरोग्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राज्यातील जीबीएसच्या संशयित आणि रुग्णांची संख्या २०५ वर पोहोचली आहे. तर दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
- जीबीएस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा नऊवर पोहोचला.
- राज्यातील जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे.
- मुंबईतील एका रुग्णालयात एका ५३ वर्षीय पुरुषाचाही जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मज्जातंतू विकारामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे, असे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
हेही वाचा-
- मुंबईत जीबीएस रुग्णाचा पहिला मृत्यू, राज्यातील मृतांची संख्या 8वर पोहोचली!
- जीबीएस संदर्भात आरोग्य मंत्र्यांचा मोठा निर्णय; म्हणाले, "त्यांच्यावर कारवाई...!"
- जीबीएस संदर्भात आरोग्य मंत्र्यांचा मोठा निर्णय; म्हणाले, "त्यांच्यावर कारवाई...!"