महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना; काचेचे तुकडे घुसल्यानं चार कामगारांचा मृत्यू - Pune Glass Factory Mishap - PUNE GLASS FACTORY MISHAP

Pune Glass Factory Mishap : पुण्यातील येवलेवाडीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका काचेच्या कारखान्यात भीषण अपघात झालाय, या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झालाय.

Pune Glass Factory Mishap
काचेच्या कारखान्यात अपघात (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 6:34 PM IST

Updated : Sep 29, 2024, 7:09 PM IST

पुणे Pune Glass Factory Mishap : पुण्यामधील येवलेवाडी परिसरात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेबाबत पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

कशी घडली घटना? :अग्निशमन विभागाचे अधिकारी समीर शेख यांनी सांगितलं की, "येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात कामगार माल ट्रकमधून खाली उतरवत असताना तो अचानक कामगारांच्या अंगावर पडला. यात अनेक कामगार दबल्याची माहिती मिळाली होती. लगेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलं. कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं." यात चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन कामगार जखमी झालेत.

चार कामगारांचा मृत्यू :या कारखान्यात झालेल्या अपघातात विकास सर्जू प्रसाद गौतम (वय 23), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय 40), पवन रामचंद्र कुमार (वय 44) आणि अमित शिवशंकर कुमार (वय 27) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. तर दोन कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काचेचे तुकडे अंगात घुसल्यानं मृत्यू :येवलेवाडी येथील सीएनजी पेट्रोल पंप मागे 'इंडिया ग्लास सोल्युशन' नावानं काचेचा मोठा कारखाना आहे. याठिकाणी मोठं-मोठे काच आणल्या जातात. त्याठिकाणी काचेवर प्रक्रिया करून त्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. रविवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास ट्रकमधून काच उतरवून घेण्याचं काम 10 कामगार करत होते. मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना बांधण्यात आलेला बेल्ट तुटला आणि दोन मोठे काचेचे स्लाईड या कामगारांच्या अंगावर पडले. काचेचे तुकडे अंगात घुसल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.

हेही वाचा

  1. रुग्णालयातील कामगारानं केला घात; बुरखा घालून आला अन्... - Mira Bhayandar Crime
  2. 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, शिक्षक अन् पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप - 16 year old boy suicide
  3. बीड हादरलं! वसतिगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल - Minor Girl Molested
Last Updated : Sep 29, 2024, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details