महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय बजेटमधून सर्वसामान्य लोकांच्या काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या... - BUDGET SESSION 2025

उद्या निर्मला सीतारमण केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. बजेटकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा आहेत. बजेटमधून सामान्य लोकांना काय मिळणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

BUDGET SESSION 2025
केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारमण (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2025, 10:49 PM IST

Updated : Jan 31, 2025, 10:59 PM IST

मुंबई : शनिवार, १ फेब्रुवारी. अर्थात प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी केंद्रीय बजेट सादर केलं जातं. शनिवारी (दि.१) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. केंद्रात भाजपाचं तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर या सरकारचं हे दुसरं बजेट असणार आहे. त्यामुळं भाजपानं निवडणुकीच्या पूर्वी जी आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या घोषणा केंद्रीय बजेटमधून होणार का? याकडं सर्वसामान्य लोकं आस लावून बसले आहेत. दरम्यान, केंद्रीय बजेटमधून सामान्य लोकांना काय मिळणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पाहूयात ईटीव्ही भारतशी बोलताना सामान्य लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.



महागाई कमी झाली पाहिजे :केंद्रीय बजेटकडं गृहिणींच्या मोठ्या आशा आहेत. घर कस चालवायचं? हा सध्या गृहिणींसमोर मोठा प्रश्न आहे. कारण, महागाई वाढल्यामुळं गृहिणींचे घरातील बजेट कोलमडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्याच्या बजेटमधून गॅसचे दर, कडधान्य आणि जीवनावश्य वस्तूंचे दर कमी झाले पाहिजेत. तरच सामान्य माणूस जगू शकेल. तसेच घर चालवताना अनेक खर्च आहेत. पगार कमी आणि महागाई जास्त असल्यामुळं सामान्य माणसानं घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. त्यामुळे जीवनावश्य वस्तूंचे दर कमी झाले पाहिजेत. अशी अपेक्षा आम्हाला बजेटमधून असल्याचं गृहिणींनी म्हटलं आहे.

केंद्रीय बजेटबद्दल ईटीव्ही भारतशी बोलताना सर्वसामन्य नागरिक (ETV Bharat Reporter)



शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे :शेतकरी अहोरात्र मेहनत करुन शेतीतून उत्पादन काढतो. त्यामुळं शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे. विशेष म्हणजे सोयाबीनच्या खरेदीला वाढ मिळाली पाहिजे. सोयाबीन, तूरडाळ यांनाही हमीभाव मिळाला पाहिजे. मुख्यत: आयात निर्यात याचं पूरक धोरण केंद्रानं अवलंबलं पाहिजे. तूरडाळीला अनुदान मिळालं पाहिजे. ऊस, कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतीतील मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच करप्रणालीत बदल झाले पाहिजे. ज्यामुळं सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात कर भरावा लागणार नाही. तसेच वाढलेल्या महागाईवर सरकारनं नियंत्रण ठेवलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया उद्याच्या बजेटवर सामान्य लोकांनी दिली आहेत.

हेही वाचा :

  1. देशाचा आर्थिक पाहणी अहवाल; जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज
  2. आर्थिक सर्वेक्षण अहवालात सर्वकाही आलबेल नाही, महागाईचे धोके कायम असल्याचे संकेत
  3. Good News! २०२५ मध्ये सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता, तर चांदी महागणार; आर्थिक सर्वेक्षणातील कल
Last Updated : Jan 31, 2025, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details