ठाणे :ठाण्यातील महानगर पालिकेचे पाहिले महापौर तथा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जुने कार्यकर्ते सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ठाणे शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते ठाण्याचे माजी महापौर आणि दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाण्यातील अनेक नेत्यांनी रुग्णालयात भेट दिली. शिवसेनेची पहिली सत्ता ही ठाण्यात मिळाली होती आणि या सत्तेचे पाहिले मानकरी सतीश प्रधान हे होते. सतीश प्रधान यांच्या निधनानं ठाणेकरांवर मोठा आघात झाला. त्यांच्यावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
कट्टर शिवसैनिक, ठाण्याचे पाहिले महापौर सतीश प्रधान यांचं निधन - SATISH PRADHAN PASSED AWAY
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक तथा ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Published : Dec 29, 2024, 6:33 PM IST
बाबरी मशीद प्रकरणात निर्दोष मुक्तता :बाबरी मशीद आंदोलनानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू होता. मात्र कालांतरानं या खटल्यात सुनावणी होवून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ठाणे वर्षा मॅरेथॉनचे अनेक वर्ष सतीश प्रधान हे आयोजन करत होते. या मॅरेथॉनसाठी हजारो विद्यार्थी धावत असत. त्यांनी सुरू केलेल्या ज्ञान साधना महाविद्यालयात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं आहे. कालांतरानं त्याचं नाव सतीश प्रधान महाविद्यालय करण्यात आलं. आजही अनेक गरजू मुलांना इथं शिक्षण मिळते. सतीश प्रधान यांचं निधन झाल्यानं ठाण्यात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :