पुणे Manoj Jarange Patil Wax Statue : एकविरा कार्ला येथे वॅक्स म्युझियममध्ये (Karla Wax Museum) मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात (Manoj Jarange Patil Statue) आलाय. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. ठिक-ठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी प्रत्येक मराठा समाज झटत आहे.
बाप लेकानं 3 महिन्यात साकारला मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा; पाहा व्हिडिओ
Manoj Jarange Patil Wax Statue : राज्यातच नाही तर सध्या देशात मराठा लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा आहे. एकीकडं मनोज जरांगे यांच्यावर चित्रपट येणार आहे. तर आता दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांचा सेलिब्रेटीप्रमाणं मेणाचा पुतळा साकारण्यात (Karla Wax Museum) आलाय.
Published : Jan 23, 2024, 4:55 PM IST
|Updated : Jan 23, 2024, 5:35 PM IST
तीन महिन्यांत साकारला पुतळा : मावळ तालुक्यातील कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तीन महिन्यांत साकारला असून मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीनं हा पुतळा उभारण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील अशोक म्हाळसकर या मराठा तरुणानं हा पुतळा बनवला आहे. अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कार्ला या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे.
वॅक्स म्युझियमला भेट देणार :पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे तर हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर परिवाराने केलाय. त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा युवक येथे येऊ लागलेत. तसंच लोणावळ्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील ही या वॅक्स म्युझियमला भेट देणार असल्याचं लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ हुलावळे आणि किरण गायकवाड यांनी सूतोवाच केलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे. मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारला आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करत असून त्यात आपणही समाजासाठी करावे यासाठी हा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं अशोक यांनी सांगितलं. अवघ्या तीन महिन्यात हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.
हेही वाचा :