महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर पोलीस दलाची उत्कृष्ट कामगिरी! गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण 100%, सामाजिक कामातही आघाडी - PERFORMANCE OF PALGHAR POLICE

Intro:Body:गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण शंभर टक्के पालघर पोलिस दलाची उत्कृष्ट कामगिरीसामाजिक कामातही आघाडी

पालघर पोलीस
पालघर पोलीस (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 1:12 PM IST

पालघर - पालघर जिल्हा पोलीस दलानं २०२४ या वर्षात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, बलात्कार अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे पालघर पोलीस दलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. त्यामुळे पालघर पोलिसांवर शाबासकीची थाप पडत आहे. विधानसभेच्या निवडणुका तसंच लोकसभेच्या निवडणुका अतिशय शांतपणे हाताळण्यामध्ये पोलिसांची कामगिरी चांगली झाली. याशिवाय निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात विदेशी तसंच बनावट मद्याचे साठे, वाहतूक, तस्करी उघडकीस आणण्याचं प्रमाणही जास्त होतं.


खून, दरोड्यातील सर्व आरोपी गजाआड - पालघर पोलिसांनी एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील आपल्या कारकिर्दीचा अहवाल सादर केला आहे. अशा प्रकारची कामगिरी अल्पावधीत सादर करून पोलिसांनी आपण समाजाप्रती उत्तरदायी आहोत, हे दाखवून दिलं. २०२४ मध्ये पालघर जिल्ह्यात खुनाचे ३५ गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून, त्यातील ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचं हे प्रमाण शंभर टक्के आहे. जिल्ह्यात २८ दरोडे पडले, त्या सर्व २८ दरोड्यांचा तपास पूर्ण झाला असून त्यातील ४७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचं हे प्रमाणही शंभर टक्के आहे. याशिवाय दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या एका प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून त्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकच गुन्हा दाखल झाला होता.


घरफोड्यात १२८ आरोपींना अटक - जिल्ह्यात २०२४ मध्ये १५७ घरफोड्या झाल्या. त्यातील ९८ गुन्हे उघडकीस आले असून १२८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचं हे प्रमाण ६३ टक्के आहे. १५७ घरफोड्यांत एक कोटी ८५ लाख ७९ हजार ४७१ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. त्यापैकी ४१ लाख ९४ हजार ४६० रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवण्यात यश आलं आहे. जबरी चोरीचे २३ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २२ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यातील ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण ९६ टक्के आहे. या गुन्ह्यात एक कोटी १७ लाख ६३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. पोलिसांनी आठ लाख पाच हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

चोरांनाही लगाम - सोनसाखळ्या पळवण्याचे पाच गुन्हे दाखल झाले होते. त्यातील चार गुन्हे उघडकीस आले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण ८० टक्के आहे. पाच लाख १२ हजार ६५५ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता त्यापैकी तीन लाख तीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा ऐवज पोलिसांनी चोरट्यांकडून परत मिळवला आहे. इतर चोऱ्यांचे १८५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १३४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून २११ जणांना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ७२ टक्के आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्याचा बंदोबस्त असतानाही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश आले. पोलिसांच्या सर्वच विभागांची कामगिरी चांगली होती. सर्वांच्या सहकार्यानेच गुन्हे उघडकीस आणता आले. - बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर


अंमली पदार्थविरोधी मोहीम - अंमली पदार्थ विरोधी कारवाईत ११ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील सर्व गुन्हे उघडकीस आले. १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात २९ लाख ९० हजार ४२१ रुपयांचा गांजा, भांग आदी माल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ सेवनाचे १० गुन्हे दाखल झाले होते, दहाही गुन्हे उघडकीस आले आहेत. यात दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मटका आणि जुगार प्रकरणात २५ गुन्हे दाखल झाले होते. या सर्व गुन्ह्यांची उकल झाली असून त्यात ७३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आठ लाख ७८ हजार ४६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वाँटेड आरोपी बाहेरच - २०२४ मध्ये १५४ आरोपी वाँटेड होते. त्यापैकी अवघ्या एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. अवैध दारू विक्री प्रकरणी ४७८ गुन्हे दाखल होते. ते सर्व उघडकीस आले आहेत. त्यात ४८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन कोटी ९५ लाख ८९ हजार ९६३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ठकबाजी प्रकरणात १३७ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ९८ गुन्हे उघडकीस आले असून ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ७१ टक्के यश आलं आहे. खंडणीचे नऊ गुन्हे दाखल झाले होते. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे.


महिला संबंधीचे सर्व गुन्हे उघडकीस - महिलांसंबंधीचे कौटुंबिक हिंसाचाराचे ३८ गुन्हे २०२४ मध्ये दाखल झाले. आत्महत्या केल्याचे चार गुन्हे दाखल होते. ते सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्ह्यात २०२४ मध्ये मुलामुलींच्या अपहरणाच्या १७० घटना दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १५२ मुले-मुली परत आली आहेत. याशिवाय हरवलेल्या मुलांचाही शोध घेण्यात आला. बलात्काराचे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांची ही कारवाई निश्चित वाखाण्याजोगी आहे. अनेक खून प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना ते उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details