महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इस्रायल हमास युद्धात युनायटेड नेशन्सचा पहिला बळी ; भारताचे सुपुत्र निवृत्त कर्नल वैभव काळे यांना गाझामध्ये वीरमरण - Colonel Vaibhav Kale Killed In Gaza - COLONEL VAIBHAV KALE KILLED IN GAZA

Colonel Vaibhav Kale Killed In Gaza : भारताचे सुपुत्र कर्नल वैभव काळे ( निवृत्त ) यांना हमास आणि इस्रायल युद्धात वीरमरण आलं आहे. वैभव काळे यांनी भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत होते. मात्र त्यानंतर त्यांनी 22 वर्ष सेवा बजावल्यानंतर भारतीय सैन्य दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर वैभव काळे हे युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये रुजू झाले होते.

Colonel Vaibhav Kale Killed In Gaza
कर्नल वैभव काळे ( निवृत्त ) (ETV Bharat Marathi)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 7:51 AM IST

Updated : May 15, 2024, 9:34 AM IST

नागपूर Colonel Vaibhav Kale Killed In Gaza :युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये नुकतेच रुजू झालेले भारतीय सैन्य दलातील कर्नल वैभव अनिल काळे ( निवृत्त ) यांना वीरमरण प्राप्त झालं आहे. हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं. कर्नल वैभव काळे हे गाझा येथून रफा येथील युरोपियन रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं, अशी माहिती पुढं येत आहे. त्यांचं शालेय शिक्षण नागपूरच्या भवन्स विद्यामंदिरात झालं आहे.

कर्नल वैभव काळे ( निवृत्त ) (Reporter)

वैभव काळे संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत :सुमारे दोन महिन्यांपूर्वीचं निवृत्त कर्नल वैभव काळे संयुक्त राष्ट्रांमध्ये सहभागी झाले होते. ते एका कर्मचाऱ्यासह यूएन फ्लॅग असलेल्या अधिकृत वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना झालेल्या हल्ल्यात ते ठार झाले. इस्रायल आणि हमास हल्ल्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. वैभव काळे यांनी जम्मू काश्मीर रायफल्स या तुकडींतर्गत विविध आघाड्यांवर सेवा दिली आहे. 22 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र नोकऱ्या सोडून त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत ‘यूएनडीएसएस’मध्ये सेवा सुरू केली. त्यांची पहिलीचं पोस्टिंग ही गाझापट्टीत रफाह इथं झाली होती.

युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीनं केलेलं ट्विट (Reporter)

दोन महिन्यापूर्वीच झाले होते सेवेत दाखल :कर्नल वैभव अनिल काळे यांनी भारतीय सैन्यदलातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर ते दोन खासगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये समन्वयक म्हणून सेवा सुरू केली होती. दोन महिन्यापूर्वीच ते या पदावर रुजू झाले होते. सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना पहिली पोस्टींग गाझामध्ये मिळाली. मात्र गाझामध्ये रफाह इथं जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. याबाबतची माहिती यूएन विभागाच्या माध्यमातून एक्सवर पोस्ट करत देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. इस्रायल गाझा युद्ध : रमजान काळात 'तत्काळ युद्धविराम' करण्याचा 'यूएन सुरक्षा परिषदे'चा ठराव - Israel Gaza War
  2. गाझामध्ये पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू
  3. संयुक्त राष्ट्र महासभा मैदानात; इस्रायल पॅलेस्टाईन युद्धबंदीचा ठराव, भारताचं 'या' ठरावाच्या बाजुनं मतदान
Last Updated : May 15, 2024, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details