छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवास करताना जीवघेणी कसरत करावी लागते. याच अडचणीला 'ईटीव्ही भारत'नं ऑक्टोबर 2023 मध्ये वाचा फोडली होती. त्याचीच दखल घेत परिवहन विभागानं दुर्गम ग्रामीण भागात आता बस सुरू केली आहे. विशेषता देश स्वतंत्र झाल्यापासून ज्या भागात कधी एसटी पोहोचली नाही, त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात विद्यार्थिनींसाठी मोफत पास देण्यात येणार असून प्रत्यक्ष शाळेवरच त्या पासचं नूतरीकरण प्रत्येक महिन्याला केलं जाणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर झाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी महामंडळाची बस सेवा सुरू (ETV BHARAT Reporter) विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असं वृत्त ऑक्टोंबर 2023 मध्ये 'ईटिव्ही' भारतनं दिं होतं. आजही काही ठीकाणी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाच्या टपावर बसून शाळेपर्यंत पोहोचावं लागतं. तसंच विद्यार्थ्यांना वेळेवर खाजगी वाहन मिळत नसल्यामुळं दहा किलोमीटरपर्यंताचा पायी प्रवास करावा लागत होता. त्यामुळं घरी पोहोचायला अंधार व्हायचा. मग ग्रामीण भागातील पालकांना मुलींची चिंता होत असे. तसंच मुलींना टवाळखोरांकडून त्रास देण्यात येत होता. हा संपूर्ण घटनाक्रम सांगताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होतं. त्यावर फुलंब्री तालुक्याबाबत 'ईटिव्ही'नं सर्वात आधी वृत्त दिलं होतं.
महामंडळानं घेतली बातमीची दखल :त्यामुळं या बातमीची दखल घेत परिवहन महामंडळानं नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करून दिली. आता विद्यार्थ्यांसाठी दुर्गम भागातून बस सुरू करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काही गावात बस सेवा सुरू झाली. यावेळी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन जंगी स्वागत करण्यात आलं. फक्त बस सुरू करण्यात आली नसून विद्यार्थ्यांसाठी मोफत पास सुविधा देखील देण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पास नूतनीकरण शाळेतचं केलं जाणार आहे, अशी माहिती बस स्थानक प्रमुख संतोष नजन यांनी दिली. त्यामुळं विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अडचणींचा सामना करत होते, त्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेणं सहज सोपं झालं आहे. या उपक्रमाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं असून आनंद व्यक्त केला आहे. तसंच बस सेवा नियमित सुरू राहील, अशी माहिती परिवहन विभागाच्या व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
पालकांनी उपस्थित केले प्रश्न :दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळेच्या पहिल्या दिवशी परिवहन विभागाची बस सुरू होणार माहिती पालकांना मिळाली, तेव्हा त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकचे आभार मानले. मात्र, बस सेवा रोज सुरू राहणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. सण, उत्सवाच्या वेळी प्रवाशांचा भार वाढल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या बस बंद करून त्या नियमित सेवेत वापरल्या जातात. त्यामुळं तशी काही अवस्था होणार नाही का? असा प्रश्न यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. तेव्हा, यापुढं शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस बंद होणार नाही, इतर व्यवस्था आम्ही करू असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. त्यामुळं पालकांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
'हे' वाचलंत का :
- ''शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण..'' राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल - Sanjay Raut
- मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics
- राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती? - Rahul Gandhi To Push Congress in UP