महाराष्ट्र

maharashtra

राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 'या' 2 जागांचा समावेश, कधी होणार मतदान? - Rajya Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 5:25 PM IST

Rajya Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 14 ऑगस्टला जारी करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. महाराष्ट्रात पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे.

Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024 (Source - ANI)

नवी दिल्ली Rajya Sabha Election 2024 :केंद्रीय निवडणूक आयोगानं 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल यांच्या जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज मागे घेण्याची तारीख देखील जाहीर केली आहे.

नऊ राज्यांतील 12 जागांवर मतदान :महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या 9 राज्यांतील 12 जागांवर निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या 12 जागांसाठी अधिसूचना 14 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट आहे. तर बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे.

भाजपा कोणाला संधी देणार ? : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले अनुक्रमे उत्तर मुंबई आणि सातारा मतदारसंघातून निवडून आले. दोघंही राज्यसभेचे सदस्य होते. दोघंही संसदेच्या एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात दाखल झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. आता राज्यसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल यांच्या जागेवर भाजपा कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मतदान आणि निकाल कधी? : राज्यसभेच्या एकूण 12 रिक्त जागांपैकी प्रत्येकी 2 आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील आहेत. हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशामधून प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे. या सर्व जागांवर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल.

रिक्त जागा कोणत्या ? :आसाममधून कामाख्या प्रसाद तासा आणि सर्बानंद सोनोवाल, बिहारमधून मीसा भारती आणि विवेक ठाकूर, हरियाणातून दीपेंद्र सिंह होड्डा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल, राजस्थानमधून केसी वेणुगोपाल आणि बिहारमधून दीपेंद्र सिंह हुड्डा यांचा समावेश आहे. त्रिपुरातून कुमार देब, तेलंगणातून केशव राव आणि ओडिशातून ममता मोहंता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. त्यामुळे या सर्व 12 जागा रिक्त झाल्या आहेत.

हेही वाचा

  1. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
  2. महायुतीला पराभवाची धास्ती? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात योजना आणि मदतीची खैरात - Maharashtra Government schemes News
  3. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - CM Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details