श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंना टोला लगावताना नागपूरMP Shrikant Shinde :रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आजपासून (14 फेब्रुवारी) खासदार कबड्डी चषक आयोजित करण्यात आला आहे. त्यात खासदार श्रीकांत शिंदे सहभागी होणार आहेत. उद्या ते संजय राठोड यांच्या मतदारसंघात आणि पोहरादेवीला येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मराठा समाजाचा शिंदेंवर विश्वास:खासदार शिंदे म्हणाले, "मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार सकारात्मक आहे. काही लोकांना तर सर्व ठिकाणी शिंदे दिसतात. तुमच्याकडे सत्ता असताना काही केलं नाही. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जे काही केलंय ते संपूर्ण महाराष्ट्रानं आणि मराठा समाजानं पाहिलंय. मराठा समाजाचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. त्याचीच प्रचिती नवी मुंबईला आलेली आहे."
रामटेक लोकसभा मतदार संघाविषयी काय म्हणाले शिंदे?नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर यावेळी भाजपा दावा सांगेल, अशी चर्चा नागपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. या संदर्भात शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, " इतर जागा संदर्भात महायुतीमध्ये अद्याप चर्चा सुरू असली तरी रामटेक संदर्भात कुणाच्या मनात शंका निर्माण होण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश होत असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत."
खासदार तुमाने चांगलं काम करताहेत:पुढे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे सर्व नेते बसून महायुतीचं जागावाटप निश्चित करतील. रामटेकच्या जागेबद्दल कोणतेही प्रश्न येण्याचं कारण नाही. इतर लोकसभा जागा संदर्भात महायुतीचे नेते निर्णय करतील. खासदार कृपाल तुमाने रामटेकमध्ये चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही तिथे मेळावा घेतला आहे. राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते करतात. एकनाथ शिंदे सर्वांसोबत नेहमीच न्याय करतात," असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
-
सरकार सकारात्मक निर्णय घेईल:मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वखाली मराठा आरक्षणासाठी संघर्ष झाला. कुणबी जातीचं प्रमाणपत्र असतील आणि सगेसोयऱ्यांच्या संदर्भात जीआर असेल असे प्रयत्न सरकारने केले आहेत. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत लोकांच्या हरकती, आक्षेप मागविले आहेत. त्यानंतर सरकार त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली.
हेही वाचा:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर, शेतकरी आंदोलनावरुन सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मोदींना कशाला प्राधान्य द्यावं ते कळत नाही
- प्रफुल्ल पटेल गिरवणार नितीश कुमारांचा कित्ता; खासदार होण्यासाठी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभा निवडणुकीचा भरणार अर्ज
- सरकारनं मागण्या मान्य करूनही उपोषण का? जरांगे यांनी उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश