महाराष्ट्र

maharashtra

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का; कोयनानगर, पोफळीला हादरे - Earthquake At Koyna Dam Area

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 6:42 PM IST

Earthquake At Koyna Dam Area : कोयना धरण परिसर बुधवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ एवढी नोंदवली गेली आहे. दरम्यान, भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

Earthquake At Koyna Dam Area
कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का (ETV Bharat Reporter)

साताराEarthquake At Koyna Dam Area :सातारा-कोयना धरण परिसराला बुधवारी दुपारी २.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दुपारी ३.२६ मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाजवळच्या हेळवाक गावापासून १३ किलोमीटर अंतरावर होता. कोयनानगरसह चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित :कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. हा भूकंप कोयनानगरसह चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे या परिसरात देखील जाणवला. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो दूरवर जाणवला नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू १३ कि.मी. अंतरावर :कोयना परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणानजीकच्या हेळवाक गावाच्या पश्चिमेला १३ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली १५ किलोमीटर होती. भूकंपामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. तसंच कोयना धरणाला देखील धोका पोहचलेला नाही.

जानेवारीत झाला होता ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप :कोयना धरण परिसरात लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असते. त्यातील सौम्य धक्के हे जाणवत देखील नाहीत. या अगोदर २८ जानेवारी रोजी धरण परिसरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू धरणापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर होता.

यापूर्वीही जाणवलेत राज्यात भूकंपाचे धक्के : महाराष्ट्रातील काही परिसरात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये मराठवाड्याचाही समावेश आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात 10 जुलै, 2024 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवले होते. परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के बसले होते. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

  1. हिंगोलीत चार वर्षात भूकंपाचे 25 धक्के; भूकंपामुळं नासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हादरे? - NASA Ligo LAB Project
  2. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिकांची पळापळ, 'या' जिल्ह्यात आहे मुख्य केंद्र - EARTHQUAKE IN HINGOLI
  3. निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात भूकंप, शेअर बाजार निर्देशांकात ५ हजार अंशाची घसरण - Share market today

ABOUT THE AUTHOR

...view details