महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार राहणार उपस्थित - drought in maharashtra 2024 - DROUGHT IN MAHARASHTRA 2024

Drought Monitoring Committee Meeting : राज्यात सध्या दुष्काळाची दाहकता वाढली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 'विभागवार दुष्काळ पाहणी समिती' गठीत केली आहे. ही समिती दुष्काळाची पाहणी करणार आहे. तसंच याद्वारे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस दुष्काळाचे गांभीर्य सरकारपुढं मांडणार आहे.

congress drought monitoring committee meeting in karad today
काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज कराडमध्ये बैठक (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 9:55 AM IST

सातारा Drought Monitoring Committee Meeting : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना अनेक ठिकाणी टँकर, चारा छावण्या आणि रोहयोची कामं सुरू नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं विभागवार गठीत केलेल्या दुष्काळ पाहणी समित्या दुष्काळाची परिस्थिती सरकारसमोर मांडणार आहे. याच अनुषंगानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ पाहणी समितीची बैठक आज (2 जून) कराडमध्ये पार पडणार आहे.

काँग्रेसकडून विभागवार समित्या स्थापन : राज्यातील जनता दुष्काळानं होरपळत आहे. तीव्र पाणी आणि चारा टंचाई निर्माण झालीय. फळबागा करपून गेल्या आहेत. रोजगार हमीची कामं बंद आहेत. दुष्काळाची ही दाहकता सरकारसमोर मांडण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतल्याचं बघायला मिळतंय. कॉंग्रेसनं विभागवार गठीत केलेल्या समित्यांच्या माध्यमातून दुष्काळाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर दुष्काळाची परिस्थिती सरकार समोर मांडली जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र समितीची आज बैठक : पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ पाहणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज कराडमध्ये आयोजित करण्यात आलीय. आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार रवींद्र धंगेकर आणि आमदार जयंत आसगावकर हे या समितीचे सदस्य आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे हे समन्वयक आहेत. विशेष निमंत्रित म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षनांही समितीत स्थान देण्यात आलंय.

काँग्रेस दुष्काळाचं गांभीर्य लक्षात आणून देणार :विरोधी पक्षाच्या दाव्यानुसार राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरू नाहीत. यामुळं विरोधी पक्षाच्या नात्यानं सरकारला दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतलाय. दरम्यान, विभागवार मिटींगनंतर दोन दिवसांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला जाणार आहे.

हेही वाचा -

  1. "मराठवाड्यात दाहक दुष्काळ", नाना पटोलेंचा शेतकरी आत्महत्यांवरुन सरकारवर हल्लाबोल - Nana Patole
  2. राज्याला बसताहेत दुष्काळाच्या झळा, काँग्रेस नेते करणार दुष्काळी पाहणी दौरे - Congress On Draught Situation
  3. 'राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर कर'; शरद पवार यांची साई चरणी प्रार्थना

ABOUT THE AUTHOR

...view details