मुंबईSangli Lok Sabha Constituency:सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला विश्वजीत कदम उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची नाराजी समोर आली होती. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एका शिष्टमंडळासोबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेऊन, सांगलीची जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी केली होती. सांगलीची जागा काँग्रेस पक्ष लढण्यास सक्षम असून अशा प्रकारची भावना आपली आणि कार्यकर्त्यांची असल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं आहे. सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडी कडून अद्याप निर्णय कळविलेला नाही. जोपर्यंत सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, आमदार म्हणून काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. आज (3 एप्रिल) होत असलेल्या मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार नसल्याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले असल्याचं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
अन्यथा महाविकास आघाडीला फटका-आनंद गायकवाड :महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. काँग्रेस पक्षासाठी चिंतेच्या बातम्या येतं आहे. सांगली लोकसभा मतदार संघ पारंपरिक काँग्रेस पक्षाकडेच होता. मात्र यावेळी यावर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करून आपला दावा केला आहे. त्यामुळे हा मतदार संघ ठाकरे गटकडे गेल्याचं जवळपास निश्चिचत झालं आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि आमदार विश्वजीत कदम नाराज झाले आहे. ही जागा काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्थानिक जनता, पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घ्यायला हव्यात; मात्र ज्या प्रकारे दोन्हीही पक्ष सीट शेअरिंग करत आहे ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीनं निवडून येणारा उमेदवार हेच निकष ठेवून निर्णय घेतला तर सांगलीची जागा काँग्रेस पदरात पाडून घेऊ शकते. अन्यथा महाविकास आघाडीला तिथे नुकसान होईल, असा दावा आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी महाविकास आघाडीला धोक्याची घंटा? - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS
Sangli Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला धक्का देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीने कंबर कसली आहे; मात्र ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत वादाची पहिली ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी यासाठी टोकाची भूमिका घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published : Apr 3, 2024, 10:24 PM IST
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत निर्णय-विकास लवांडे :सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत ज्या चर्चा सुरू आहेत यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सांगितलं आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन आपला दावा सांगितला आहे. तर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे या जागेचा तिढा सुटण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून आज उद्या यावर निर्णय येईल, असा विश्वास विकास लवांडे यांनी वक्त केला आहे.
हेही वाचा :
- श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची खेळी, 'या' महिला उमेदवाराला कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी - Lok Sabha Election 2024
- एक खासदार पडला तर फरक पडत नाही, रायगडचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक - LOK SABHA ELECTION 2024
- खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? बच्चू कडूंचा सवाल; बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू संतापले - LOK SABHA ELECTION 2024