नागपूर : "मतदान हा लोकशाहीचा उत्सव तर आहेचं, आपलं कर्तव्य देखील आहे. आपला अधिकार आहे. आज कुटुंबासोबत मतदान केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा जास्त अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं," असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क (Reporter) मतदानाचा टक्का वाढेल : "लोकसभा निवडणुकीच्या वेळी याद्यांमध्ये घोळ होता. तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती, त्याच्यात इम्प्रूमेंट झालं. लोकसभेसारखं ऊन आज नाहीये, त्यामुळे निश्चित टक्का वाढेल. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात महिलांची संख्या 5 ते 6 टक्केनं पुरुषांपेक्षा कमी आहे. महिला मतदान करून ही टक्केवारी भरून काढतील," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
'सरकारकडून अपेक्षा करायच्या असतील तर आधी मतदान करा'; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन (Reporter) अनिल देशमुखांवरचा हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी : जनतेचं प्रेम मिळतं तेव्हा, चेहऱ्यावर हास्य असतं. प्रेम मिळताना दिसून येत आहे, म्हणून त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आहे, अशी मिश्कील टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तर अनिल देशमुखांवरील आरोपावर बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला फेक आहे, असं कालचं मी बोललो आहे. ती सलीम जावेदची स्टोरी होती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क (Reporter) बिटकॉइन संदर्भात सखोल चौकशी व्हावी : "बिटकॉइन संदर्भात मीडियात मी बघितलं आहे. या संदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे. आरोप खरच गंभीर आहे, गंभीर आरोपाची सखोल चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर येणं जनतेचा अधिकार आहे. विनोद तावडे संदर्भात त्यांनी कुठलेही पैसे वाटले नव्हते. त्यांच्याजवळ पैसे मिळून आलेले नाहीत. आरोप करण्यासाठी इको-सिस्टीम वापरण्यात आली. नाना पटोले, सुप्रिया सुळेंवर जे आरोप लावले, ते पूर्व आयपीएस अधिकाऱ्यांनी लावले आहेत. त्या आरोपांच्या क्लिप समोर आल्या आहेत."
हेही वाचा :
- बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
- "1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार", राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
- लाइव्ह सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार-सुप्रिया सुळे