मुंबई Devendra Fadnavis News : "प्रत्येकाचे वेगवेगळे छंद असतात. जर का त्यांनी ते छंद जोपासलं तरच ते आयुष्यात पुढं जातात. परंतु एखादा फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर प्रॉब्लेम होतो."असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईत भाजपा आमदार अमित साटम यांच्या 'उडान' या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
पुस्तकात मंत्र सुद्धा आहे आणि तंत्र सुद्धा आहे: भाजपा आमदार अमित साटम यांनी लिहिलेल्या "उडान" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. भाषणात बोलताना फडणवीस यांनी अमित साटम यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रशंसा केली. परंतु ही प्रशंसा करत असताना राजकीय चिमटे काढायला फडणवीस विसरले नाहीत. ते म्हणाले, "एक फोटोग्राफर आहे. त्याचा छंद फोटोग्राफीचा आहे. पण तो मुख्यमंत्री होतो. अशानं बराच प्रॉब्लेम होतो. मी कोणावर टीका करत नाही. मी कोणाचं नाव घेतलं नाही आहे. हा राजकारणाचा कार्यक्रम नाही आहे. मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगत आहे. ज्या गोष्टीचा तुम्हाला छंद आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घडवल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. या पुस्तकात मंत्रसुद्धा आहे आणि तंत्रसुद्धा आहे," असं सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला.
'उडान' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी उपस्थितांशी संवाध साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter) पुस्तक वाचतात जिवंतपणा वाटतो:फडणवीस म्हणाले की, "मला असं वाटतं राजकारणामध्ये तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण आपल्या विषयाला समजायला पाहिजे. समाजासाठी काय चांगलं आहे हे आपल्या विषयाला निर्भिडपणे मांडता आलं पाहिजे. एका लेखकानं केवळ त्याच्या अनुभवातून लिहिलेले हे पुस्तक नाही. जीवन जगत असताना अमित साटम हे अनुभवातून काही शिकले आहेत. ते या पुस्तकात लिहिले गेले आहे. म्हणून हे पुस्तक वाचतात जिवंतपणा वाटतो."
जीवनात शॉर्ट कट नसतो: फडणवीस पुढे म्हणाले की, " उपदेश द्यायला फार मोठे मोठे उपदेश दिले जाऊ शकतात. आजची पिढीसमोर अनेक प्रश्न आहेत. ते शॉर्टकटच्या माध्यमातून आयुष्याला पुढे न्यायचा प्रयत्न करतात. पण आपण सर्वांना माहीत आहे की, जीवनात शॉर्ट कट नसतो. जीवनात आव्हानं असतील ती आव्हानं स्वीकारावीच लागतील. ती स्वीकारूनंच तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्यात शॉर्ट कट नाही. जीवनात आव्हानांचा सामना कसा कराल, याबद्दल सुंदर विचार या पुस्तकात मांडले गेले आहेत."
हेही वाचा
- हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस - Maharashtra Budget 2024
- है तैय्यार हम! विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याची आमची तयारी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार स्पष्टच बोलले - Budget Session 2024