महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल

Death Threat To PM Modi : गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहिला तर राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना फोन करून धमकी देण्यात आली असून, याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडं तक्रार दाखल केली आहे.

Death threat to Prime Minister Narendra Modi state spokesperson of BJP Shivaray Kulkarni received a call from England
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 3:31 PM IST

Updated : Mar 11, 2024, 3:40 PM IST

शिवराय कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ता भाजपा

अमरावती Death Threat To PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कॉल थेट इंग्लंडवरुन आलाय. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या फोनवर सोमवारी (11 मार्च) सकाळी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करत पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लगेच शिवराय कुलकर्णी यांनी बडनेरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तर गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ झाली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात काहीसं चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय.

भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत उडवणार :शिवराय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात रक्तपात न करता 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' ची इमारत बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देखील या फोन कॉलद्वारे देण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली तर भारत कमजोर होईल, असं देखील या कॉलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं म्हटलंय. कुलकर्णी यांना +447537168320 या क्रमांकावरुन सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी कॉल आला होता. या कॉलवर युनायटेड किंगडम असं नमूद होतं. तसंच धमकी देणाऱ्या व्यक्तीनं आपण खलिस्तानी समर्थक असल्याचं म्हटल्याचंही शिवराय कुलकर्णी यांनी सांगितलं.

बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार : या गंभीर प्रकाराबाबत शिवराय कुलकर्णी यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारी सोबतच फोन कॉलचे डिटेल्स आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांना सादर करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास व्हावा, अशी मागणी देखील शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. गेल्या 2 वर्षात राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ, कोणकोणत्या नेत्यांना आली धमकी?
  2. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी; वेशांतर करुन राहणाऱ्या मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
  3. राहुल गांधी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्रकरण, नाशिकमधून एक माथेफिरू ताब्यात
Last Updated : Mar 11, 2024, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details