महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात अभियान राबवत आहेत: मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल - Manoj Jarange On Devendra Fadnavis - MANOJ JARANGE ON DEVENDRA FADNAVIS

Manoj Jarange On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात अभियान राबवत आहेत, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. मागच्या दारानं आलेले आमदार पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर टीका करत आहेत. मात्र त्यावर आता बोलणार नाही. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान समाज रस्त्यावर उतरेल, त्यावेळी ताकद दाखवणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 1:09 PM IST

Updated : Jul 25, 2024, 2:37 PM IST

मराठा आंदोलक मनोज जरांगे (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange On Devendra Fadnavis : गोरगरीब लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसून उत्तर द्यायचं आहे, त्यासाठी तयारी करत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केली. "सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात अभियान राबवत आहेत. मागच्या दारानं आलेले आमदार पत्रकार परिषद घेऊन टीका करत आहेत. त्यांना उत्तर देणार नाही, मात्र डोक्याच्या वर पाणी गेलं तर नक्कीच त्यावर बोलेल," अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. "7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळात जनसंवाद यात्रा निघणार असून पाऊस असला, तरी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आपली ताकद रस्त्यावर दाखवेल," असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारचं आवाहन असल्यानं उपोषण स्थगित : "आंदोलन सुरू होतं, मात्र मी आंदोलक असल्यानं आशावादी आहे. सरकारनं थेट मला आवाहन केलं नसलं, तरी प्रसिद्धी माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महिने मागितले, म्हणून मी त्यांना ते दिले. सलाईन घेऊन पडून राहण्यापेक्षा निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. आता सत्ताधारी आणि विरोधक आमचे नसल्यानं थेट गोरगरीब लोकांसाठी मैदानात यावं लागेल," अशी टीका जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. "आंदोलन करत असताना याआधी पण सलाईन काढलं होतं. रक्ताची धार त्यावेळी लागली होती. सलाईन लावली म्हणजे माणूस मरत नाही, असं होत नाही, फक्त शरीराला पाणी मिळतं. मात्र शरीरात जे नुकसान व्हायचं ते तर होतंच. त्यामुळे आता तसं न करता आपण मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहे," असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांचा टेबलाजवळ माणूस बसवायचा : "गोरगरीब मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलाच्या जवळ बसवायचा आहे, म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपांना तिथल्या तिथं उत्तर देणं सोपं होईल. मी आता कुठल्याही प्रकारचं उत्तर यांना देणार नाही, माझ्या डोक्याच्या वर पाणी गेलं तर नक्कीच बोलेल," अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. तर "नारायण राणे यांच्यावर आजपर्यंत कधीही बोललो नाही. त्यांनी माझं वक्तव्य त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये, मात्र माझा पट्टा सुटला तर काही खरं नाही. निलेश राणे यांनी त्यांना समजून सांगावं," असं आवाहन मनोज जरांगे यांनी राणे यांना केलं. "सध्या देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात अभियान राबवत आहेत आणि तितकेच मराठे पेटून उठणार आहेत. आम्ही भाजपाचे आमदार बसवले, आता त्यांना कळेल की मराठा समाजाला विरोध करून काय होतं. आम्हाला उघडं पाडण्याचं काम केलं, तर तुम्हीच उघडे पडणार आहात. सध्या मला घेरण्याचं काम केलं जात आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही, मात्र लोक फोडण्याचं काम केलं जात आहे. 29 ऑगस्ट रोजी समाजाची बैठक घेऊन भांडाफोड करतो," अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

7 ते 13 ऑगस्ट दरम्यान समाज रस्त्यावर : "भाजपाचे मागच्या दारातून आलेले लोक सध्या पत्रकार परिषद घेऊन बोलत आहेत. मात्र त्यांना फारशी किंमत आम्ही देत नाही. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळात पाऊस असला, तरी मराठा समाज तुम्हाला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसेल. आमच्या यात्रेचा पुढचा टप्पा यात होत असून सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या पट्ट्यात आम्ही जाणार आहे. त्यावेळेस मराठा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येईल," असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा :

  1. सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…; श्याम मानव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी - पाहा व्हिडिओ - Shyam Manav On Devendra Fadnavis
  2. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर...; श्याम मानव यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांचा चढला पारा - Devendra Fadnavis On Shyam Manav
Last Updated : Jul 25, 2024, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details