महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगातून निघतात घामाच्या धारा, मग घ्या ना कोल्हापुरातील मोहब्बत, नफरत, बेवफा सरबत - कोल्हापुरातील आरोग्यवर्धक सरबत

Kolhapur Mohabbat Sarbat : कोल्हापूरच्या आदम नदाफ या तरुणानं बनवलेलं एक आगळं-वेगळं सरबत पिण्यासाठी ग्राहक त्याच्या ठेल्यावर गर्दी करत आहेत. मोहब्बत, नफरत आणि बेवफा या नावांनी तीन प्रकारचं सरबत तो बनवून विकतो. चला जाणून घेऊया या सरबताचं वैशिष्ट्य

Kolhapur Mohabbat Sarbat
आदम नदाफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 6:47 PM IST

Updated : Mar 9, 2024, 9:02 PM IST

कोल्हापुरातील आगळ्या-वेगळ्या सरबतविषयी माहिती देताना आदम नदाफ

कोल्हापूरKolhapur Mohabbat Sarbat:सध्या सुरू असलेल्या मार्च महिन्यात सूर्य जसा-जसा माथ्यावर येईल तशी अंगाची लाहीलाही होणारा उष्मा जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकजण थंड प्येय पिण्यासाठी शहरातील आइसक्रिम पार्लरमध्ये गर्दी होत आहे. मात्र कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर शेजारील एका तरुणानं लावलेल्या हटके बोर्डावर प्रत्येकाची नजर पडत आहे. मोहब्बत, नफरत, बेवफा सरबत हे शब्द वाचून बघणारा काही काळ गोंधळतो आणि आपसुकच या तरुणाच्या गाडीवर थांबतो. सबजा बी, रोज सिरप, दूध, साखरपाक या आरोग्यवर्धक पदार्थांपासून बनवलेलं सरबत उष्म्यापासून काही काळ गारवा मिळवून देतं. शहरात अनेक ठिकाणी थंड सरबत प्यायला मिळतं; परंतु या तरुणानं कल्पकतेनं सरबतांची नावं वापरली आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

सरबत पिण्यासाठी ग्राहकांची रांग :कोल्हापुरातल्या आदम नदाफ या तरुणाची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. मात्र घरखर्च आणि कमावण्याचं साधन शोधण्यासाठी त्यानं सोशल मीडियाचा आधारानं 'मोहब्बत का सरबत' ही संकल्पना त्याला सुचली. दिल्लीमध्ये 'मोहब्बत का सरबत' बनवतानाचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर पाहिला होता. आपणही असंच नवं काहीतरी करावं म्हणून त्यानं पहिल्यांदा घरामध्येच प्रयोग केला. घरातील सदस्यांना हे सरबत आवडल्यानंतर यातून पुढं जात मोहब्बत, नफरत आणि बेवफा अशा तीन प्रकारची सरबतं बनवायला त्यानं सुरूवात केली. दूध-कलिंगड-रोज सिरप-साखरेचा पाक यापासून मोहब्बत सरबत, सफरचंद-सब्जा-दूध-रोजसिरप-साखरेचा पाक हे आरोग्यवर्धक पदार्थ वापरून 'नफरत का सरबत' तर मोहब्बत आणि नफरत यांच्या मिश्रणातून 'बेवफा सरबत' करुन विकण्याची सुरुवात आदम यांनं केली. सुरुवातीचं एक वर्ष त्याला कोणताही नफा झाला नाही. मात्र स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यानं बनवलेल्या सरबताचे व्हिडिओ हजारो जणांपर्यंत पोहोचवले आणि आता आदमच्या गाड्यावर दुपारी 11 ते 4 या वेळेत कोल्हापूरकरांची अक्षरशः रांग लागलेली असते.


अशी आहेत मोहब्बत, नफरत, बेवफा सरबत :या नवीन संकल्पनेबद्दल आजम सांगतो, "माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो. त्याला प्रथम मोहब्बत होते नंतर नफरत आणि या दोन्हीचं संयुक्त सरबत म्हणजे बेवफा अशी ही संकल्पना आहे. ग्राहक या हटके पेयाची चव चाखण्यासाठी आदमच्या गाड्यावर गर्दी करत आहेत.


सोशल मीडियावर अधिक पसंती :कोल्हापूरच्या या तरुणानं सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून आपला व्यवसाय आणि नवी संकल्पना तरुणांपर्यंत पोहोचवली आहे. यामुळे मोहब्बत, नफरत आणि बेवफा सरबत पिण्यासाठी गाड्यावर कोल्हापूरकर गर्दी करत आहेत. सोशल मीडिया वरूनही अनेक जण आदम नदाफ याला याबाबत विचारणा करतात. सकाळी अकरा वाजता हे सरबत पिण्यासाठी झुंबड उडालेली असते.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीसांनी दिले मनसेबरोबर युतीचे संकेत; म्हणाले, "भूमिका भाजपासारखीच"
  2. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दाखवलं 'सत्तेचं गाजर'; म्हणाले, "संयम राखा..."
  3. "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते, पण..."; आमदार योगेश कदमांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
Last Updated : Mar 9, 2024, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details