महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामगिरी महाराजांविरोधात अल्पसंख्यकांमध्ये संतापाची लाट; माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Ramgiri Maharaj Controversy - RAMGIRI MAHARAJ CONTROVERSY

Ramgiri Maharaj Controversy : रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारं विधान केल्यानंतर मुस्लिम समाजातील लोकांकडून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठत आणि रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Ramgiri Maharaj Controversy
रामगिरी महाराजांविरोधात अल्पसंख्याकांकडून निषेध (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 7:39 PM IST

ठाणे Ramgiri Maharaj Controversy :नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचनादरम्यान रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं आहे. रामगिरींनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात अल्पसंख्यकांकडून निषेध व्यक्त होत आहे.

रामगिरी महाराजांविरोधात अल्पसंख्यकांकडून निषेध (Source - ETV Bharat Reporter)

एफआयआर नोंदवण्याची मागणी : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट संकुलात नाशिकच्या रामगिरी महाराजांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजातील लोकांनी वागळे पोलीस ठाणे गाठलं आणि रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या वादग्रस्त विधानासाठी मुस्लिम समाजानं यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. "दोन दिवसात आम्ही रामगिरी महाराजांवर विविध कलमांखाली एफआयआर नोंदवू. जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल, ती आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन पोलिसांनी दिलय.

रामगिरी महाराजांनी मर्यादा ओलांडली : वागळे पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या मुस्लिम समाजातील लोकांनी सांगितलं, "देशातील अल्पसंख्यकांबाबत वादग्रस्त विधान करणं किंवा दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करणं हे प्रकार सातत्यानं वाढत आहेत. नाशिकच्या रामगिरी महाराजांनी ही मर्यादा ओलांडली आहे. रामगिरी महाराज यांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू. आम्ही सर्व सहन करू शकतो, पण आमच्या धर्मगुरूंविषयी चुकीचं विधान केलं तर ते आम्ही सहन करू शकत नाही."

जे बोलायचं होतं ते बोललो : रामगिरी महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. "जे बोलायचं होतं ते मी बोललो आहे. सध्या धार्मिक कार्यक्रमांचा सप्ताह सुरू आहे. त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर पाहू," अशी प्रतिक्रिया रामगिरी महाराज यांनी दिलीय. याआधी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीही मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारं विधान केलं होतं. दरम्यान आता रामगिरी महाराजांनी त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात केली आहे, असा आरोप होत आहे.

हेही वाचा

  1. रामगिरी महाराज यांच्या समर्थनात श्रीरामपुरात रास्ता रोको; समर्थकांकडून संरक्षणाची मागणी - Ramgiri Maharaj Controversy
  2. नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता; तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, पोलिसांचं नागरिकांना आवाहन - Ramgiri Maharaj Controversy
  3. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी कार्यवाहीची गरज - मुंबई उच्च न्यायालय - Bombay High Court

ABOUT THE AUTHOR

...view details