मुंबई Yashomati Thakur : राज्यातील तृतीयपंथीयांचं धोरण अद्याप जाहीर झालं नसून तृतीयपंथीयांनाही माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा, तसंच राज्यातील उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तसंच त्यांच्या नोकरी बाबत सरकारनं दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ओबीसी घटकांसाठी घरकुल योजना सक्षमपणे राबवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत केली.
ॲड. यशोमती ठाकूर विधानसभेत मत मांडताना (ETV Bharat Reporter)
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर : विधानसभेत आज महत्त्वाच्या विषयावर बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी उमेद अंतर्गत काम करणाऱ्या लाखो महिलांच्या वेतनाबाबत आणि त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबाबत सरकारनं योग्य दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. या महिला भगिनी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. त्यामुळं सरकारनं त्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
तृतीय पंथीयांनाही माझी लाडकी बहीण लागू करा : राज्यातील महिला धोरण जाहीर झालं असलं, तरी तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर झालं नाही, ते आमदारांपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळं राज्यातील तृतीय पंथीयांची अवस्था अत्यंत बिकट असून, त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हलाखीची आहे. तृतीय पंथीयांना एसटी प्रवासात सवलत मिळावी. तसंच त्यांच्यासाठी माझी लाडकी बहीण ही योजना ही लागू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार ॲड. ठाकूर यांनी केली.
ओबीसी घरकुल योजना सक्षम करा : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील ओबीसी समाजासाठी घरकुलं देण्यात येत आहेत. मात्र, यातील पहिला टप्पा झाला असून पुढील दोन टप्प्यांचं काम होत नाही. त्यामुळं ओबीसी समाजात नाराजी असून या समाजाच्या घरकुलांसाठी सरकारनं ताबडतोब कार्यवाही करावी आणि त्यांना घरकुलं देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी सुद्धा यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली.
हेही वाचा :
- अमरावतीत कार्यालयावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष : खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Amravati MP Office Dispute
- "...तर सिव्हिल वार होईल"; कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा काय? - Lok Sabha result
- मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; जिल्हा बँकेच्या पातळीवर राबविली जाणार योजना - ladki bahin yojana