मुंबई CM Eknath Shinde Pre-Monsoon Meeting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई मान्सून पूर्व नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरुवातीला वडाळा येथील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर बांद्रातील मेठी नदी येथील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी 100% पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिले.
नालेसफाई श्रेयवादासाठी नाही :नालेसफाई कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के नालेसफाई झाली पाहिजे. मुंबईत पाणी कोठोही पाणी साचू नये यासाठी उपाय योजना करण्याच्या सुचना शिंदे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, अशा ठीकाणी हाय प्रेशरचे पंप ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नालेसफाईची पाहणी श्रेय घेण्यासाठी करत असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कुठलेही कामं किंवा नालेसफाईची कामं श्रेयासाठी करत नाही. आम्ही लोकांच्या हितासाठी काम करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांना लगावला.
कारवाई करणार : दुसरीकडं पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाली पाहिजे, याची जबाबदारी पालिका अधिकारी, कर्मचारी यांची असेल. जे अधिकारी, कर्मचारी आपल्या कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनीही कचरा टाकताना काळजी घेतली पाहिजे. कचरा नाल्यात न टाकता कचराकुंडी टाकावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना केलंय.