महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी, पण कुणाची? - CM Eknath Shinde Apology - CM EKNATH SHINDE APOLOGY

CM Eknath Shinde Apology - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर राजकारण पेटलं आहे. आंदोलनं केली जात आहेत. यामध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चुका असल्याचं विरोधक दावा करुन पटवून देत आहेत. सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे. वाचा सविस्तर वृत्त...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 6:02 PM IST

Updated : Aug 29, 2024, 6:22 PM IST

मुंबई CM Eknath Shinde Apology : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मोडून पडल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी एकदाच काय शंभरदा महाराजांचे पाय धरुन आपण माफी मागण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. काम निकृष्ट झालं. त्यात आपण कुठेतरी कमी पडलो, याबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुतराम कबुली न देता थेट महाराजांची माफी मागितली. मात्र त्यावरुन होत असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना टोला लगावला.

विरोधकांचे दावे - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला. आंदोलनादरम्यान काही घटना घडल्या. विरोधकांनी या पुतळा प्रकरणी अनेक संबंधितांची नावं घेऊन हे महायुती सरकारचच पाप असल्याचा दावा केला. मात्र यामध्ये राज्य सरकारचा थेट संबंध नसल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक होऊन आपलं मत मांडत आहेत. तसंच पुतळ्याचे कारागिर, कार्यक्रमाचे कंत्राटदार यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कसे संबंध आहेत, याबाबत पुरावे देण्यात येत आहेत. कार्यक्रमावरती किती खर्च झाला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस एसपी चे आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर माहिती देऊन घरापेक्षा खिडक्या दारं महाग अशी शेलकी टीका केली आहे. हेलिपॅड तयार करण्यासाठी दोन कोटींच्यावर खर्च झाल्याचं त्यांनी तत्कालीन खर्चाचे पुरावे देऊन स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्र्यांची माफी - या सगळ्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तुम्ही माफी मागणार का असं विचारलं असता, त्यांनी याबाबत चाललेलं राजकारण अधिक अयोग्य असल्याचं सांगून, झालं ते चांगलं झालं नाही, त्यासाठी आपण एकदा का शंभरदा महाराजांच्या पायावर मस्तक ठेवायला तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की, दोन समित्या नेमल्या आहेत. त्यामध्ये ही घटना घडली त्यातील दोषी कोण आहेत, ते शोधण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई संदर्भात एक समिती काम करेल. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भक्कम पुतळा पुन्हा उभारण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ही तज्ञांची समिती पुन्हा कसा पुतळा उभारता येईल यासंदर्भात अहवाल देईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue
  2. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन..."; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आवाहन - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "वडिलांचा पुतळासुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारच्या..."; राजकोट राड्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Last Updated : Aug 29, 2024, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details