अमरावती Chikhaldara Bhimkund News : अद्याप पावसाचा जोर नसला तरी जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटात मात्र, अधून-मधून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मेळघाटात धबधबे कोसळायला लागली आहेत. परंतु मेळघाटातील भीमकुंड धबधबा सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी म्हणजेच 1 जुलै आणि २ जुलै रोजी बंद असल्यानं पर्यटकांच्या आनंदात विरजण पडणार आहे.
भीमकुंड धबधबा परिसरात माकडांचा हैदोस (ETV Bharat Reporter) या कारणामुळे बंद: भीमकुंड या ठिकाणी सध्या लाल तोंडाच्या माकडांनी उच्छाद मांडला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना लाल माकडांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांना धोका नये उद्भवू नये म्हणून वनविभागाकडून काळजी घेण्यात येणार आहे. वनविभागाकडून विशेष मोहिमेअंतर्गत माकडांचा बंदोबस्त केला जाणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे यांनी ईटीव्हीशी भारती बोलताना दिली. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर या माकडांनी हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. पर्यटकांची काळजी आणि सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
अशी पकडण्यात येणा माकडं भीमकुंड येथे अनेक ठिकाणी पिंजरे लावले जाणार आहेत. या पिंजऱ्यामध्ये माकडांना पकडून त्यांना जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांना बंदी असणार आहे. पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यशवंत बाहाळे यांनी केले आहे.
पावसाळ्यात चिखलदऱ्यात वाढतात पर्यटक:विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलधरा पर्यटन क्षेत्रातील महत्वाचा पॉइंट म्हणून भीमकुंडाची ओळख आहे. 1500 फूट खोल दरी आणि खोल डोंगरावरून पडणारा धबधाब हे या पॉइंटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. दरवर्षी देशविदेशातील अनेक पर्यटक पावसाळ्यात या ठिकाणी येतात. चिखलदरासह संपूर्ण मेळघाट हा पावसाळ्यात बहरतो. हिरवेगार जंगल, नदी नाल्यांमधून खळखळ वाहणारे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळणारे सुंदर धबधबे यांचा आनंद लुटतात. चिखलदरा आहे मेळघाटातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्याच्या प्रत्येक दिवशी पर्यटकांची गर्दी राहते.
हेही वाचा
- मेळघाटात चक्क आंब्याचं गाव! आंब्यानं बहरला आमझरी परिसर, काय आहेत गावाची वैशिष्ट्ये - Mango Village
- अमरावतीत 400 वर्ष जुने औषधी गुणयुक्त गोरखचिंचेचं झाड, मूळच्या आफ्रिकेतील या वृक्षाला असतं दीड ते दोन हजार वर्ष आयुष्य - Gorakhchinch tree