महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्र रिल्ससाठी शूट करताना तरुणीनं चुकून टाकला रिव्हर्स गिअर, दरीत कार कोसळल्यानंतर गमाविलं आयुष्य - Chhatrapati Sambhajinagar Accident - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR ACCIDENT

Chhatrapati Sambhajinagar Accident News : रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा हे व्हिडिओ बनवणं आणि फोटो काढणं धोकादायकही ठरतं. इतकंच नाही तर यामुळं काहींना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच आणखी एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. तरुणीला कारमध्ये बसून रिल्स बनवणं जीवावर बेतलंय.

Chhatrapati Sambhajinagar Accident News
छत्रपती संभाजीनगर अपघात (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 7:33 AM IST

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Accident News : 30 सेकंदाची रिल बनविण्याच्या नादात एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात सोमवारी (17 जून) दुपारी घडला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं? : श्वेता दिपक सुरवसे (वय- 23, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय- 25, रा. हनुमाननगर) हे छत्रपती संभाजीनगर येथून टोयाटो इटिऑस कार क्रमांक एम. एच. 21 बी. एच. 0958 नं सूलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी फिरण्यासाठी आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवताना तिनं आपल्या मित्राला सांगितलं की, "मी कार चालवते तू त्याची रिल बनव." तरुणी कार चालवायला नवीन असल्यानं तिनं कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला. कार पाठीमागं असलेल्या दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर अपघात (Source - ETV Bharat reporter)



घटनेचा व्हिडिओ आला समोर : सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येत असतात. सोमवारी दुपारी ही घटना घडली. मात्र, मंदिर परिसरात जर संरक्षण भिंत अथवा लोखंडी कठडे असते तर हा अपघात टळला असता, अशी सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरीत पडलेल्या कारमधून तरुणीला बाहेर काढून खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.

हेही वाचा -

  1. कर्नाटकातून शिर्डीला जाणाऱ्या खासगी बसची बिअरच्या कंटेनरला धडक, 18 जण जखमी, 4 गंभीर - chhatrapati sambhaji nagar accident
  2. धक्कादायक! कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडलं; अपघात की आत्महत्या, याबाबत उलट सुलट चर्चा - Koyna Express Accident
  3. दार्जिलिंगमध्ये भीषण रेल्वे अपघात; कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक, 15 प्रवाशांचा मृत्यू - Kanchenjunga Express Accident

ABOUT THE AUTHOR

...view details