छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालना-पुणे येथील कार्यकर्ते आणि संस्थांचे प्रमुख यांची काल (21 जून) मुंबईत बैठक झाली. त्यात काही मागण्या मंजूर झाल्या आहेत आणि काही मागण्या अधिवेशन काळात पूर्णती तेव्हा निर्णय होईल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तो निरोप घेऊन मंत्री छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी गेले. त्यानंतर हाके यांनी उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं वडीगोद्रीला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अतुल सावे यांचा समावेश होता.
कार्यकर्त्यांची प्रकृती ढासळली :वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरात बसलेल्या इतर ओबीसी आंदोलकांची प्रकृती ढासळत होती. त्यामुळं उपोषण सोडावं म्हणून त्यांना विनंती करण्यात आली, असं छगन भुजबळ म्हणाले. तर आंदोलकांनी लिखित द्या अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेला संदेश आणि बैठकीत झालेली चर्चा याबाबत आंदोलन स्थळी जाऊन चर्चा करण्यात आली, असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यानंतर हाके यांनी उपोषण सोडलं