महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवऱ्याचे मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध नसल्यामुळे बायकोने नवऱ्याच्या मैत्रिणीवर दाखल गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द - Case On Husband Girlfriend

Case On Husband Girlfriend: बायकोने नवऱ्याच्या मैत्रिणीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यात एफआयआर दाखल केला होता. (FIR against girlfriend) त्या विरोधात नवऱ्याच्या मैत्रिणीने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Mumbai High Court) या प्रकरणात न्यायमूर्ती एन आर बोरकर, न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, बायकोने नवऱ्याच्या मैत्रिणीवर प्रेम संबंध असल्याचा केवळ आरोप केलेला आहे. त्यात तथ्य दिसत नाही. त्यामुळे प्रेयसीवरील दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्यात यावा. 25 जानेवारी रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश पत्र जारी केलेले आहे.

Case On Husband Girlfriend
मुंबई उच्च न्यायालय

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 10:47 PM IST

मुंबई Case On Husband Girlfriend :2016 यावर्षी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या ठिकाणी पती-पत्नी विवाहात अडकले. त्याच्यानंतर त्यांचा पाच वर्ष सुखाने संसार चालला. 2022 मध्ये बायकोने नवऱ्याच्या आणि नवऱ्याची मैत्रीण ती प्रेयसी असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये बायकोकडून आरोप करण्यात आला होता की, (FIR against husband) नवऱ्याची जी मैत्रीण आहे ती नवऱ्याला व्हाट्सअपवर मॅसेज पाठवते. नवऱ्याचे आणि तिचे प्रेमसंबंध आहे आणि नवऱ्याला ती माझ्यापासून (बायकोपासून) वेगळं करत आहे. नवऱ्यावर दबाव टाकते आणि नवऱ्याला घटस्फोट घ्यायला सांगत आहे. त्यामुळेच ती कुटुंब उध्वस्त करत आहे. अशा पद्धतीचा एफआयआर सुरगाणा पोलीस ठाण्यामध्ये बायकोने दाखल केला होता.



विवाह संबंध नवऱ्याचे आहेत असा केवळ आरोप :मित्राच्या बायकोनेच अशा प्रकारचा गुन्हा दाखल केल्यावर मुंबई न्यायालयामध्ये कथित प्रेयसीने धाव घेतली आणि हा गुन्हा खोट्या पद्धतीनं दाखल केलेला गेला आहे. हा केवळ काल्पनिक आरोप आहे आणि हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती केली होती. कथित प्रेयसीची बाजू मांडणारे वकील अभिषेक कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या समोर मुद्दा उपस्थित केला की, ''बायकोचा केवळ नवऱ्यावर संशय आहे आणि तसा आरोप आहे की, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहे. परंतु, त्याची मैत्रीण ही त्याच्यात कोणत्याही प्रकारचे विवाहबाह्य संबंध नाहीत. त्यांचे कोणतेही प्रेम संबंध नाहीत. हे नवऱ्यानं अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे. परंतु केवळ नवरा बायकोमध्ये भांडणे होतात. म्हणून बायकोने तसे आरोप केलेले आहेत."



बायकोचा आरोप प्रेयसी नवऱ्याला स्वतःपासून वेगळं करतेय:बायकोची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी मुद्दा स्पष्ट केला की, "बायकोने यासंदर्भात सुरगाणा पोलीस ठाण्यामध्ये पतीवर अत्याचार करणे कलम 498 तर 406 कुटुंबाविरुद्ध गुन्हेगारी आणि अविश्वासाचे वातावरण तयार करणे, 323 नुसार गंभीर दुखापत करणे, मानसिक धक्का पोहोचवणे, अपमान करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक त्रास देणे कलम 504 तसेच भारतीय दंड संहिता कलम 34 या अंतर्गत देखील नवऱ्याच्या मैत्रिणी विरोधात आरोप करीत गुन्हे दाखल केले होते. प्रेयसी नवऱ्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होती."


कथित प्रेयसीवरील एफआयआर रद्द करा:दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, ''बायकोने नवऱ्याच्या मैत्रिणी बाबत आरोप केलेले आहेत. परंतु, नवऱ्याने आणि कथित प्रेयसीने तसे विवाहबाह्य संबंध असल्याचं स्पष्टपणे नाकारले आहेत. त्या संदर्भातील उपलब्ध तथ्य पुरावे पाहता केवळ आरोपाच्या आधारावर गुन्हे दाखल करता येऊ शकत नाही. सबब मैत्रिणीवरील दाखल गुन्हे रद्द केले जात आहेत, असा निर्णय दिला.

हेही वाचा:

  1. महाराष्ट्रातील रामभक्ताकडून प्रभू श्रीरामांना 80 किलोची विशेष तलवार भेट
  2. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  3. ठरलं! वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत; पुढील बैठक 30 जानेवारीला

ABOUT THE AUTHOR

...view details