मुंबई Flat Selling Fraud Case: गुढीपाडव्याच्या दिवशी तक्रारदार ईश्वरलाल बंजारा (वय 61) यांनी 11 एप्रिल 2013 मध्ये गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरमध्ये असलेल्या कल्पतरू रेसिडेन्सी या नावाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत गेले आणि टू बीएचके फ्लॅट 2 करोड 20 लाख रुपयांना घ्यायचे ठरवले. 1 करोड 50 लाख रुपये मिळवण्यासाठी ईश्वरलाल यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज केला आणि कियाना वेंचर्स एलएलपीला 2 करोड 9 लाख रुपये देऊन फ्लॅट बुक केला.
या कलमांनुसार गुन्हा दाखल :अशाच प्रकारे अजून पाच जणांनी देखील या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले. मात्र, कियाना वेंचर्स एलएलपी यांनी दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न दिल्याने कोर्टाने दिलेल्या आदेशावरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी ओम प्रकाश मेहता, नरेंद्र लोढा, देवेश भट, इस्माईल कांगा, अनुज मुनोत, मोफतराज मुनोत आणि पराग मुनोत यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 420, 409, 34, 120 ब आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 कलम 4 आणि 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एजंटचा फोन आला आणि :तक्रारदार ईश्वरलाल वंजारा यांना 8 एप्रिल 2013 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मोबाईलवर एका एजंटचा फोन आला आणि त्याने गोरेगाव पश्चिम येथील कल्पतरू रेसिडेन्सी नावाने बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती दिली. तसेच त्याचे ओपनिंग 11 एप्रिल 2013 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याचे देखील माहिती दिली. त्यानंतर ईश्वरलाल हे आपल्या पत्नीसोबत गोरेगाव पश्चिम येथील कल्पतरू रेसिडेन्सी या ठिकाणी गेले आणि या प्रोजेक्टचे विकासक आणि प्रमोटर पराग मुनोत, मोफतराज मुनोत, अनुज मनोज आणि पार्टनर इस्माईल कांगा हे असून या प्रोजेक्टचे इन्चार्ज देवेश भट, प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र लोढा हे होते.
रूमचा ताबा देणार असल्याची केली बतावणी :तक्रारदार यांनी भेट दिलेल्या गोरेगाव पश्चिम येथील साइटवर विकासाच्या माणसांनी त्यांना प्रोजेक्टचे संपूर्ण माहिती दिली आणि हा प्रोजेक्ट 2017 मध्ये पूर्ण होणार असून याचवर्षी रूमचा ताबा दिला जाणार असल्याची बतावणी केली. या प्रोजेक्टमध्ये 2 बीएचके, 3 बीएचके आणि 3.5 बीएचके आणि 4 बीएचके फ्लॅट बनणार असल्याचं सांगितलं. तसेच तक्रारदार ईश्वरलाल यांनी टू बीएचके फ्लॅट बाबत विचारणा केली आणि त्यांना 2 करोड 20 लाख रुपये फ्लॅटची किंमत सांगण्यात आली.
रूमचा ताबा दिलाच गेला नाही :बँकेतून कर्ज काढून ईश्वरलाल बंजारा यांनी फ्लॅट घेण्याचे ठरवले. त्यानंतर ऑक्टोबर 2014 ते जून 2018 पर्यंत कियाना वेंचर्स एलएलपी या विकासकाच्या कंपनीला 2 करोड 9 लाख 40 हजार 197 रुपये देण्यात आले. 22 जुलै 2015 रोजी तक्रारदार ईश्वरलाल यांचे गोरेगाव स्थित कल्पतरू रेसिडेन्सीच्या कार्यालयात सेल ऑफ एग्रीमेंट तयार करण्यात आले. या एग्रीमेंटवर कियाना वेंचर्स एलएलपीतर्फे अधिकार गोविंद वाधवानी अधिकार ओम प्रकाश मेहता यांनी एग्रीमेंट बनवले होते. त्या एग्रीमेंटमध्ये फ्लॅटचा ताबा जून 2017 रोजी मिळेल असे नमूद केले होते. या एग्रीमेंटची प्रत देखील पोलीस ठाण्यात सादर करण्यात आली आहे, अशी माहिती तक्रारदार ईश्वरलाल वंजारा यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बोरिवलीतील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले. प्रत्येक वेळेस पेमेंट करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमधून ई-मेल आणि डिमांड लेटर राहत्या घरी पाठवले जात असल्याची माहिती तक्रारदार यांनी पोलिसांना दिली आहे. ईश्वरलाल यांना स्टॅम्प ड्युटीसाठी 2 करोड 20 लाख 38 हजार 705 रुपये भरावे लागले आहे. तरी देखील जून 2017 मध्ये तक्रारदार यांना रूमचा ताबा न मिळाल्याने विचारणा केली असता कार्यालयामधून प्रोजेक्ट इन्चार्ज देवेश भट यांनी वेळोवेळी रूमचा दाबा देतो असे सांगितले. मात्र अद्याप ताबा देण्यात आला नाही.
या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल :ईश्वरलाल यांच्या प्रमाणेच चेतन गांधी, जयेश चौधरी, राकेश शहा, विशाल बधे, जितेंद्र जैन यांनी देखील कोट्यावधी रुपये फ्लॅट घेण्याकरिता भरले होते. त्यानंतर हे प्रकरण विशेष एमपीआयडी कोर्टात गेले आणि नंतर कोर्टाने हे प्रकरण सीआरपीसी कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश गोरेगाव पोलिसांना दिले. त्याप्रमाणे गोरेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांचे 17 कोटी 68 लाख 50 हजार 342 रुपये घेऊन त्यांना फ्लॅट न दिल्याने पराग मुनोत, मोफतराज मुनोत, अनुज मुनोत, इस्माईल कांगा, देवेश भट, नरेंद्र लोढा आणि ओम प्रकाश मेहता या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही, पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांचा भुजबळांवर निशाणा - Hemant Godse On Election 2024
- नरेंद्र मोदी यांची भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, शपथविधीचंही दिलं निमंत्रण - PM Narendra Modi Oath Ceremony
- महाराष्ट्रात भाजपाच्या सुमार कामगिरीचे साईड इफेक्ट्स; संघटनात्मक फेरबदलाची दाट शक्यता - BJP in Maharashtra