महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराच्या फर्न हॉटेलनंतर विशाल अग्रवालच्या एमपीजी क्लबलाही ठोकलं टाळं - Vishal Agarwal - VISHAL AGARWAL

Vishal Agarwal MPG Club Sealed : महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळावरील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनानं बडगा उगारलाय. बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेलं पाचगणीतील फर्न हॉटेल सील केल्यानंतर शनिवारी (1 जून) सकाळी विशाल अग्रवालच्या एमपीजी क्लबलाही टाळं ठोकण्यात आलंय.

Builder Vishal Agarwal Mahabaleshwar illegal MPG club sealed
विशाल अग्रवाल एमपीजी क्लबला ठोकलं टाळं (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 12:49 PM IST

सातारा Vishal Agarwal MPG Club Sealed : देशभरातील पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळं असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत अनधिकृत बांधकामांनी कळस गाठलाय. या बांधकामांना आता सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, चित्रपट निर्माता समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेल्या पाचगणीतील फर्न हॉटेलनंतर शनिवारी (1 जून) बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लाबलाही टाळं ठोकण्यात आलंय. या कारवाईमुळं अनधिकृत बांधकाम करणाऱ्या महाराष्ट्राच्या नंदनवनातील व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत.

कोण आहे समीर हिंगोरा? : पाचगणीतील फर्न हॉटेलमध्ये पार्टनरशीप असलेला समीर हिंगोरा हा 1993 च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोप आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला एके-56 रायफल पुरवल्याप्रकरणी दोषी धरून टाडा कोर्टानं त्याला 9 वर्षांचा सश्रम कारावास आणि 2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी हिंगोरानं संजय दत्तसोबत 'सनम' चित्रपटाची निर्मिती केली होती.

अचानक झालेल्या कारवाईचा पर्यटकांना मनस्ताप :सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यामुळं महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. अशातच अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आलाय. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देताच प्रशासनानं अनधिकृत बांधकामं असणाऱ्या मिळकती सील करायला सुरूवात केली. पाचगणीतील फर्न हॉटेल सील केल्यानंतर पर्यटकांना हॉटेल सोडावं लागलं. अचानक झालेल्या कारवाईमुळं पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळं हॉटेल व्यवस्थापनावर पर्यटकांनी संताप व्यक्त केलाय.

अग्रवालच्या एमपीजी क्लबला ठोकलं टाळं : सलग दोन दिवस प्रशासनानं दोन मोठ्या हॉटेलला सील ठोकल्यानं महाराष्ट्राच्या नंदनवनात खळबळ उडाली आहे. पाचगणीनंतर प्रशासनानं शनिवारी सकाळी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरातील एमपीजी क्लब हॉटेल सील केलं. हॉटेल सील करण्यात आल्याची नोटीस चिटकवण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली असून या कारवाईमुळं विशाल अग्रवालला मोठा झटका बसलाय.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामांची झाडाझडती, पाचगणीतील 'त्या' हॉटेलला ठोकलं टाळं - Pune Hit and Run Accident
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case
  3. सुरेंद्र अग्रवाल यांचं अजून एक अंडरवर्ल्ड संबंध पुढे, तुला तर मारून टाकेल, अजून एकाला दिली होती धमकी - Surendra Agarwal

ABOUT THE AUTHOR

...view details