महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर हादरलं! हातपाय बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह, मुलगी बेपत्ता - Palghar Crime News - PALGHAR CRIME NEWS

Palghar Crime News : हातपाय बांधलेल्या अवस्थेत डोंगरा लगतच्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. पालघर तालुक्यातील सावरे ग्रामपंचायत हद्दीतील बर्डे पाड्यामधूम ही घटना समोर आलीय.

Palghar Crime News
नाल्यात आढळला मृतदेह (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 10:18 PM IST

Updated : Sep 2, 2024, 10:31 PM IST

पालघर Palghar Crime News : पालघर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या सावरे ग्रामपंचायतीतील बर्डे पाड्याजवळील नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला, तर तिची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती आहे.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास डोंगराजवळील नाल्यात एक मृतदेह आढळून आला. दगडाला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मनोर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दगडाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह :सुस्मिता प्रवीण डावरे (वय 28) असं मृत महिलेचे नाव आहे. दगडाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. मृत महिलेचा पती मासेमारीच्या बोटीवर काम करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करीत आहेत.

तिघांचे कुजलेले मृतदेह आढळले :पालघर तालुक्यातील नेहरोली या गावात शनिवारी, 31ऑगस्ट 2024 रोजी एकाच कुटुंबातील तिघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. तिघांचा खून करुन मारेकऱ्यांनी घराला बाहेरुन कुलूप लावलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मुकुंद बेचलदास राठोड, कांचन मुकुंद राठोड आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड असं मृतदेह आढळलेल्या तिघांची नावं आहेत. राठोड कुटुंब मूळचं गुजरात राज्यातील असून मागील 20 वर्षापासून ते नेहरोली इथं राहत होते. त्यांना दोन मुलं असून एक मुलगा वसई इथं तर दुसरा मुलगा गुजरामधील राजकोट इथं राहतो.

हेही वाचा

  1. दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident
  2. मद्यधुंद प्रवाशानं हुज्जत घालून बेस्टचं स्टेअरिंग पकडलं; बसच्या अपघातात ८ जखमी, तरुणीचा मृत्यू - Best Bus Accidet
  3. अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case
Last Updated : Sep 2, 2024, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details