महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024 - ASSEMBLY ELECTION 2024

Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक 2024 भाजपा केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवाणार नसल्याचे स्पष्ट संकेत अमित शाह यांनी घेतलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत देण्यात आले. या बैठकीत कार्यकर्त्यांना पत्रक वाटण्यात आले. या पत्रकातही आगामी निवडणूक नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर वाबनकुळे यांच्या सामूहिक मार्गदर्शनाखाली लढवणार आहे, असा स्पष्ट उल्लेख आहे.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 7:56 AM IST

नागपूर Assembly Election 2024 :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षानं राज्यात लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे यावेळी भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्यावर डाव खेळण्याची रिस्क घेणार नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. यावेळी भाजपा महाराष्ट्रात केवळ देवेंद्र फडणवीस नाही, तर नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे अशा सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार असल्याचा स्पष्ट संदेश अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत देण्यात आला आहे. त्यामुळे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याची तयारी तर नाही ना, अशी शंका आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

पत्रक (Reporter)

कार्यकर्त्यांच्या बैठकीत वाटण्यात आले पत्रक :नागपुरात अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत कार्यकर्त्यांना एक पत्रक देण्यात आलं आहे. त्यामध्ये "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आपली नवीन परीक्षा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडं आहे. तसेच अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेनं विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे," असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

निवडणूक होईस्तोवर थांबणार नाही, थकणार नाही : जोवर आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही. तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही. आता सर्वांचं एकच लक्ष्य आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक," असा उल्लेखही या पत्रकात करण्यात आला आहे.

चक्रव्यूहात अडकायचं नाही : "लोकसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षासाठी महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्युहात अडकवू पाहत आहेत. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे," असा कानमंत्र कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका संदर्भात काही सूचना आणि नियोजनाबद्दलचं मार्गदर्शनही कार्यकर्त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. अमित शाह यांची मोठी खेळी; विधानसभेच्या तोंडावर आवाडे पिता पुत्राचा भाजपामध्ये पक्षप्रवेश - Amit Shah Kolhapur Visit
  2. "महाराष्ट्राबाहेरील बाजारबुणग्यांनी आम्हाला खतम करण्याची भाषा करू नये", उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांना टोला - Uddhav Thackeray On Amit Shah
  3. भाजपाच्या मेळाव्यासाठी अमित शाह राज्यात; महायुतीतील जागा वाटपावरुन संभाजीनगर इथं होणार बैठक ? आगामी निवडणुकीची रंगणार खलबतं - Amit Shah Visit To Maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details