महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

''उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे लाचार'', अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका - Atul Bhatkhalkar - ATUL BHATKHALKAR

Atul Bhatkhalkar : पालघर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुती विजय मिळवेल, असा विश्वास भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलाय.

Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 12:27 PM IST

Updated : Jul 1, 2024, 12:36 PM IST

पालघरAtul Bhatkhalkar on Uddhav Thackeray: "विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला 159 जागा मिळून बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा विश्वासघात केला," असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आता महाविकास आघाडीत ठाकरे यांचे भजे झाले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे ठाकरे आणि संजय राऊत लाचार झाले असल्याची टीका त्यांनी केली.

अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका (Source - ETV Bharat Reporter)

पालघर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यासाठी अतुल भातखळकर पालघर येथे आले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठाकरे गटाच्या नाकावर टिच्चून सांगलीत यश : यावेळी बोलताना अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आला होता. तरीही काँग्रेसने तेथे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं काम केलं. निवडून आल्यानंतर पाटील यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलं. असं असतानाही ठाकरे यांना ते सहन करावा लागलं. महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले आहेत, " अशी टीका त्यांनी केली.

विधानसभेच्या सर्व जागा निवडून आणू : "पालघर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. एका विधानसभा मतदारसंघात फक्त एक हजार मतांनी महायुती पिछाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुती विजय मिळवेल," असा ठाम विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.

गावितांच्या पुनर्वसनावर थेट भाष्य नाही : माजी खासदार राजेंद्र गावित यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी थांबवून त्यांचं राज्यात पुनर्वसन करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलाय. यावर बोलताना ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षात कोणाचीही उमेदवारी कापली जात नाही. भाजपामध्ये केंद्रीय व राज्य कमिटी सर्वांगीण विचार करून उमेदवार ठरवते. या वेळी हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचंड मतांनी विजयी झाला. गावित यांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करायचे याबाबतीत राज्यातील नेते निर्णय घेतील," असं त्यांनी सांगितलं."

विकसित भारताचं स्वप्न साकार करू : पालघर लोकसभा मतदारसंघात हेमंत सावरा यांना विजयी केल्याबद्दल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी जनतेनं दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. "पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त मोदींना मिळाला आहे. देशाच्या जनतेनं भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी कामाला लागले आहेत. त्यात ते नक्की यशस्वी होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीत बहुजन विकास आघाडी नाही : महायुतीत विधानसभेला बहुजन विकास आघाडी हा पक्ष असेल का? याचं थेट उत्तर न देता भातखळकर यांनी महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष हेच पक्ष असल्याचं सांगितलं. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विजेची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यांनी महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्था हे प्रश्न सामूहिक असून त्याबाबतही उपाययोजना केल्या जातील, असं सांगितलं. लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसोबत छुपा समझोता असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

  • यावेळी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, महेंद्र पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबजी काठोले, माजी आमदार विलास तरे, माजी आमदार अमित घोडा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, मधुकर भोये, वीणा देशमुख संदीप पावडे, मनोज बारोट,पुंडलिक भानुशाली आदी उपस्थित होते.

हेही वाचा

  1. कंटेनर कुठून येतात-जातात हे वेळ आल्यावर सांगणार-एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Maharashtra politics
  2. इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबतचा खर्च नक्की जातो कुठं, मी अहवाल मागवून चौकशी करणार : खासदार अमोल कोल्हे - MP Amol Kolhe
  3. विधानसभा निवडणुकीची धुरा देवेंद्र फडणवीसांकडं : केंद्रीय मंत्री, भूपेंद्र यादव - Maharashtra Assembly elections
  4. शरद पवारांसारखे नास्तिक वारीत कसे चालणार? भाजपाची टीका - BJP criticizes Sharad Pawar
Last Updated : Jul 1, 2024, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details