रत्नागिरी Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी जाहीर मेळावा घेऊन नारायण राणे हे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजपा कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज नारायण राणे सादर करणार उमेदवारी अर्ज :लोकसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी 3 वाजता ही मुदत संपणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडं दाखल करणार आहेत. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार तथा लोकसभा सहाय्यक प्रभारी बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन तेली, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महायुतीतील अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित :महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपामार्फत शिवसेना, राष्ट्रवादी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. गुरूवारी सकाळी नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा भारतीय जनता पार्टीमार्फत करण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही नारायण राणे यांना विजयी करणार, असा दावा केला आहे.
अशी निघणार नारायण राणे यांची रॅली :शुक्रवारी सकाळी 10 वाजता मारुती मंदिर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नारायण राणे यांची रॅली माळनाका, जेलनाका मार्गे जयस्तंभ इथं पोहोचेल. निवडक नेत्यांसह नारायण राणे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर जयस्तंभ इथंच नारायण राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
हेही वाचा :
- राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात; 101 टक्के विजयी होणार, मतदानानंतर गडकरींचा विश्वास - Lok Sabha Election 2024 Live Update
- राज्यातील शेवटच्या मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा 'भंडारा'; भाजपा आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Bhandara Gondia Lok Sabha
- नागपूर आणि रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात; 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Nagpur Lok Sabha Constituency