महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले, "अदानीच्या मागे..."

Bharat Jodo Nyaya Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज (16 मार्च) मुंबईतील चैत्यभूमी येथे समारोप झाला. यावेळी बोलत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच धारावीची जमीन बळकावण्यासाठी अदानीच्या मागे पंतप्रधानांची ताकद असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Bharat Jodo Nyaya Yatra Ends In Mumbai Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi says Modi strength is behind Adani
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 10:37 PM IST

मुंबई Bharat Jodo Nyaya Yatra :मणिपूरपासून निघालेली कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा 6700 किलोमीटरचं अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली. मुंबईत भारत जोडो यात्रेचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रविवारी (17 मार्च) शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून या सभेतून इंडिया आघाडी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तसंच या सभेत सोनिया गांधी या देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राहुल गांधी? : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केलं. ते म्हणाले की, "देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी आणि अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे. परंतु, दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळाकणाऱ्या अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान मोदी ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावलं जातंय", असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आजही लढाई ही धारावी विरुद्ध अदानी : पुढं ते म्हणाले की, "धारावी तुमची आहे आणि तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारच्या छोट्या-छोट्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं, कौशल्याचं काम येथे होत आहे, या उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे, बँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी भारताचं उत्पादन हब बनवले पाहिजे. कारण, धारावीच खऱ्या अर्थानं ‘मेक इन इंडिया’ आहे. देश तुमच्या सारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतो, दलालांमुळं नाही. परंतु, आज मेहनत तुम्ही करता आणि पैसा अदानी घेऊन जातो. आज लढाई कौशल्य आणि दलाल यांच्यात आहे, आज लढाई धारावी विरुद्ध अदानी अशी आहे."

...त्यामुळं राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली : यावेळी बोलत असताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या की, "सरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवतंय. देशाची वस्तुस्थिती कळावी आणि जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील 10 वर्षांत महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. केवळ मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचं दाखवलं जातंय. परंतु, परिस्थिती तशी नाही. जीएसटी आणि नोटबंदीनं देशातील जनतेचे प्रचंड हाल केलेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. 4 वर्षांची लष्करी सेवा करुन काय करायचं, अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजपा सरकार गरिबांसाठी काम करत नाही ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करतं", असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : "काळ्या पैशाचा स्त्रोत बंद झाल्यामुळं...", देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर
  2. Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त प्रियंका गांधी झाल्या सहभागी; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत
  3. Rahul Gandhi: इलोक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details