महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे नेमकी भानगड? - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलंय. पुणे न्यायालयानं हा वॉरंट जारी केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या..

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 9:59 PM IST

Updated : Jul 23, 2024, 10:28 PM IST

पुणे Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) काढण्यात आलंय. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा वॉरंट काढण्यात आला आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने (Pune Court) अटकेचं वॉरंट काढलं आहे.

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्यांचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल आहे. आंदोलनामुळं मनोज जरांगे पाटील हे न्यायालयात हजर झाले नव्हते.

काय आहे प्रकरण? : मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग 2013 मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केलं होतं. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळं त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

20 जुलैपासून उपोषण सुरू : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे.

हेही वाचा -

  1. "मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांच्या मनात..."; मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन - Deepak Kesarkar on Manoj Jarange
  2. "विधान परिषदेत निवडून आले म्हणून आम्हाला त्रास देऊ नका"; मनोज जरांगे पाटील यांचा कुणाकडं रोख? - Manoj Jarange Patil
  3. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil
Last Updated : Jul 23, 2024, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details