महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युगांडा येथे पारंपरिक गणेशोत्सव; छत्रपती संभाजीनगर येथील अनंत पांडव यांचा पुरोहित म्हणून सन्मान - Ganeshotsav 2024

Ganeshotsav 2024 : सध्या देशभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व असलं तरी इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. देशाबरोबर परदेशात राहणारे अनेक भारतीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. असातच पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात काही महाराष्ट्रीयन कुटुंबांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला आहे.

Ganeshotsav 2024
युगांडा येथे पारंपारिक गणेशोत्सव (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 8:24 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ganeshotsav 2024 :देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देश-विदेशात देखील महाराष्ट्रीयन कुटुंबीय विधिवत हा सोहळा साकारत आहेत. पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात वसलेल्या काही महाराष्ट्रीयन कुटुंबांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. यात विधिवत पुजा करण्याचा मान संभाजीनगर येथील वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांना मिळालाय. दहा दिवसात पारंपारिक पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कळावी याकरिता हा प्रयत्न करत असल्याची माहिती, महाराष्ट्र मंडळ कंपालाचे अध्यक्ष सुधीर बलसुरे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना सुधीर बलसुरे, रिना कोरे, अनंत पांडव गुरुजी (ETV BHARAT Reporter)


२८ वर्षांपासून गणेशोत्सव होतोय साजरा : देशात नव्हे तर जगात भारतीय सण साजरे केले जात आहेत. विदेशात भारतीयांचा दबदबा प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो. रोजगार निमित्त लाखो लोक जगभरात विस्तारलेले आहेत. पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात २८ वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र मंडळ कंपाला ही मराठी बंधुभागीनींची नोंदणीकृत संस्था आहे. १०० पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन कुटुंब मंडळाचे सभासद आहेत. आज महाराष्ट्र मंडळ कंपाला हे ५०० हूनही अधिक सभासदांचे एक एकत्र कुटुंब बनले आहे. दरवर्षीमहाराष्ट्र मंडळ गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतो आणि यंदाही दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जात आहे. पूर्ण १० दिवसांची आरास आणि पूजा ही अत्यंत भक्तिभावाने केली जाणार आहे. या उत्सवात दररोज १००० हून जास्त भक्ताना महाप्रसाद वाटलो जातो अशी माहिती, सुधीर बलसुरे यांनी दिली.



अनंत पांडव गुरुजी यांचा पुरोहित म्हणून सन्मान : पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशाची राजधानी कंपाला येथे गणेशोत्सव साजरा करताना विधिवत पुजन करण्याचा मान छ. संभाजीनगर येथील पुरोहित वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांना देण्यात आला. गणेश चतुर्थीच्या आधीच त्यांना तिथे बोलवण्यात आले. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना पांडव गुरुजी यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे विधिवत केली. गणपतीची दहा दिवस दोन वेळेस पूजन केली जाणार असून या काळात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रक्तदान, भागवत गीता वाटप आणि अश्या बऱ्याच काही सामाजिक बांधिलकीचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहे. इकडे आल्यावर इथला उत्साह पाहून हा सण देशाबाहेर साजरा होत नसून महाराष्ट्रातच असल्याचा अनुभव येत असल्याचं अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलं. मंडळाचे अध्यक्ष सुधीर बलसुरे आणि त्यांचे सहकारी उपाधक्ष्य रिना कोरे, सचिव हनुमंत काटकर, कोश्याधक्ष योगेश तल्हान आणि त्यांचे सर्व पदाधिकारी मिळून यावर्षीही खूप उत्साहात गणेश उत्सव साजरा करत आहेत.

हेही वाचा -

  1. 'या' शुभ मुहूर्तावर गौराई येणार माहेरी; जाणून घ्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरीची कथा - Jyeshtha Gauri Avahana 2024
  2. एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ... - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details