महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत कार्यालयावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष : खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Amravati MP Office Dispute - AMRAVATI MP OFFICE DISPUTE

Amravati News : अमरावतीत खासदार कार्यालयावरुन भाजपा- काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला. खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Amravati MP Office Dispute
बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 2:17 PM IST

अमरावती Amravati News :खासदार म्हणून निवडून आल्यानंतर एक महिना उलटून गेला. परंतु तरीही आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदारांचे संपर्क कार्यालय मिळत नसल्यानं अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार संपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेस कार्यकर्त्यांसह आत प्रवेश केला. याप्रकरणी पोलिसांनी खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्यासह 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे निवडून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय नवनीत राणा यांनी खाली करून एक महिना उलटून गेला. मात्र, हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं नवीन खासदाराला देण्यात आलं नव्हतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या समोर हा विषय मांडला. तेव्हा त्यांनी सबुरीचा सल्ला दिला. यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदारांच्या संपर्क कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यकर्त्यांसह आतमध्ये प्रवेश केला.

बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर प्रतिक्रिया (Source reporter)



राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी खासदारांचे कार्यालय आपल्याला मिळावं, असा 19 जूनला अर्ज दाखल केला होता. परंतू त्या पूर्वीच खासदार बळवंत वानखडे यांनीसुद्धा संपर्क कार्यालय मिळावं, म्हणून अर्ज दिला होता. जिल्हाधिकारी हे कार्यालय दुसऱ्या खासदाराला देऊ इच्छितात, असा आरोप करत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला.


खासदार वानखडे, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल : या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, 149, 427, 135 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, तिवसाचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, योगेश वानखडे, राजा गडलिंग, गौतम वानखडे, मनोज वानखडे, शफी सौदागर, विजय गणवीर यांच्यासह दहा ते पंधरा काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. "...तर सिव्हिल वार होईल"; कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा काय? - Lok Sabha result
  2. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आणले कुठून? ॲड. यशोमती ठाकूरांचा नवनीत राणांना सवाल - Adv Yashomati Thakur
  3. नोकरशाहीतील गुणवत्ता आणि आरक्षण संपवण्याचा डाव; यशोमती ठाकूर यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details