अमरावती Amravati Crime News : 280 रुपयांची बियर 250 रुपयात मागितल्यावर ती देण्यास बारमालकानं नकार देताच बारमालकावर चक्क रिव्होल्वर काढून गोंधळ घालण्याचा प्रकार अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात जुन्या बायपासवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्यामुळं खळबळ उडालीय.
नेमका प्रकार काय :शहरातील जुन्या बायपास रोडवर एक रेस्टॉरंट आणि बार आहे. शनिवारी रात्री पंकज सुदामा झांबानी (24) हा बार मालक गल्ल्यावर बसला असताना त्याच्या रेस्टॉरंटमध्ये नियमित येणारे यश कडू आणि अभिषेक डिक्याव उर्फ मामू रमेश (24) हे दोघंही जेवण करत होते. जेवण झाल्यावर त्यांनी गल्ल्यावर येऊन पंकज झांबानी याला बियर मागितली. यानंतर 280 रुपये किंमत असणारी बियर 250 रुपयात दे असं यश आणि अभिषेक या दोघांचं म्हणणं होतं. मात्र कमी पैशात बियर देणार नाही असं म्हणत पंकज झांबानी यांनी दोघांनाही आता एक वाजत आला रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ झाली असं म्हटलं. आपल्याला कमी किमतीत बियर देत नसल्यामुळं यश कडू आणि मामू रमेश या दोघांनी पंकज झांबानी याच्यासोबत वाद घातला. यावेळी यश कडू यानं चक्क रिव्होल्वर काढून पंकजच्या दिशेनं रोखली. या प्रकारामुळं रेस्टॉरंटमध्ये एकच खळबळ उडाली. पंकजवर रिवाल्वर ताणून तुला पाहून घेईल अशी धमकी देत दोघेही निघून गेले.
कमी पैशात बियर दिली नाही म्हणून थेट बारमालकावर ताणली रिव्हॉल्वर; अमरावतीतील घटना - Amravati Crime - AMRAVATI CRIME
Amravati Crime News : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात जुन्या बायपासवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कमी पैशात बियर न दिल्यानं बारमालकावर रिव्होल्वर ताणल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्यामुळं खळबळ उडालीय.
Published : Jun 2, 2024, 10:45 PM IST
पोलिसांनी एकाला केली अटक : या घटनेमुळं हादरलेल्या पंकज झांबानी यानं झालेल्या प्रकाराची माहिती त्याचे वडील सुदामा झांबानी यांना दिली. सुदामा झांबानी यांनी यासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यश कडू आणि अभिषेक डिक्याव हे रेस्टॉरंटमध्ये नेहमी येत असल्यामुळं पंकज झांबानी त्यांना नावानिशी ओळखत होता. पोलिसांना या संदर्भात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अभिषेक डिक्याव याला अटक केलीय.
हेही वाचा :