मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीनं पोर्शे कार अपघातात प्रकाशझोतात आलेले आमदार सुनिल टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडं बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यानं अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :
झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला अनुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
निशिकांत पाटील : इस्लामपूर
संजय काका पाटील : तासगाव