मुंबई - मुंबईतील वांद्रे उपनगरात भारत नगर या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2024 रोजी विहान कंपनीच्या वतीने पुनर्वसनाचे काम सुरू होते. त्यात काफिल अहमद खान, झीनत काफिल अहमद खान, आणि निलोफर तारीक खानसह इतर आरोपींनी विकासकाच्या काही लोकांनी धमकी दिली. शिवीगाळ केली आणि चाकू भोसकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल झाला होता. परंतु हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत संबंधित तीन आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या समोर आरोपींच्या वकिलांनी ही बाब नजरेस आणून दिली, की एकाच दिवशी एकाच वेळेला एकाच घटनेचे दोन एफआयआर नोंदवले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या एफआयआर बाबतच शंका उत्पन्न होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी तीन आरोपींना अटकपूर्वक जामीन मंजूर केलेला आहे. 13 मार्च रोजी न्यायालयाने हा निर्णय जारी केला आहे.
"एकाच घटनेच्या दोन एफआयआर कशा असू शकतात ?"असा प्रश्न उच्च न्यायालयाने वेगळ्या खटल्यात केला. तसेच मुंबई पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. न्यायमूर्ती सारंग कोतवाल म्हणाले,"भारत भरात सर्वत्र एका गुन्ह्याच्यासाठी एकच एफआयआर असतो. इथे मात्र दोन एफआयआर एकाच वेळी एकाच ठिकाणी आहेत. गुन्हा देखील एकच आणि त्यात जो गुन्हा पोलीस सांगतात तो तर एफआयआर मध्ये नाही, अशी टिपण्णी करत उच्च न्यायालयाने तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय केला.
जीवे मारण्याची धमकी आणि चाकू भोसकल्याचा गुन्हा
पोलिसांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांच्या एफआयआरनुसार यातील तीन आरोपी काफिल अहमद खान, झीनत काफिल अहमद खान, आणि निलोफर तारीक खान यांनी परिसरातील काही नागरिकांना चाकूने भोसकले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे जर यांना अटक नाही केली, तर हे विकासकाच्या कामात पुन्हा अडथळा आणतील, असा युक्तीवाद केला.