वराहातील अफ्रिकन फ्लू विषयी माहिती देताना यु. डी. पाटील नंदुरबारDead Pigs Medical Report:नंदुरबार जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. म्हसावद येथील डुकरांचा मृत्यू स्वाईन फिवरने झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. बाधित भागातील १ कि.मी. परिघातील क्षेत्र धोकादायक घोषित करण्यात आलं असून पशुसंवर्धन विभागाच्यावतीनं कलिंग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तर तर १० कि. मी. परिघातील क्षेत्राला संनियत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पशुवैद्यकीय विभागाचे पथक म्हसावद येथे तळ ठोकून असून डुकरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती नंदुरबारचे पशू संवर्धन विभाग उपायुक्त उमेश पाटील यांनी दिली आहे.
अखेर 'त्या' डुकरांचा अहवाल पॉझिटिव्ह :शहादा तालुक्यातील म्हसावद येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी शेकडो वराहांचा मृत्यू झाला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने मृत डुकरांचे नमुने घेऊन भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानुसार, डुकरांचा मृत्यू 'अफ्रिकन स्वाईन फिवर'ने झाल्याचं निष्पन्न झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात 'अफ्रिकन स्वाईन फिवर' रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यानं हा रोग जलद गतीने पसरत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण्यांमधील संसर्ग, सांसर्गिक रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण अधिनियमाप्रमाणे शहादा तालुक्यातील म्हसावद येथील १ कि.मी. परिघरातील भागास बाधित क्षेत्र घोषित केलं. यासह १० कि.मी. परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. बाधित क्षेत्र परिसरातील सुमारे चार डुकरांचं काल किलिंग करण्यात आलं आहे.
अफ्रिकन स्वाईन फिवरच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना :शहादा तालुक्यातील म्हसावद गाव आणि परिसरातील बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. अफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय सनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे आणि सुयोग्य जैव सुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसंच जंगली डुकरातील अनियमित मरतुकीवर बारकाईने लक्ष ठेवावं. डुकराच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदी करण्याची प्रक्रिया करून त्या आस्थापनांना स्थानिक पशु वैद्यकांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसंच मोकाट पद्धतीने होणारे वराह पालन टाळण्यात यावे. घरगुती तसंच हॉटेलमध्ये वाया गेलेले किंवा शिल्लक राहिलेले अन्न डुकरांना देणे ही विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत असल्यानं अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. याशिवाय निरोगी डुकरांचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसंच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.
विषाणू नियंत्रणासाठी उपाययोजना :वराह पालन केंद्रातील तसंच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. वराह पालन करणारे पशुपालक आणि व्यवसायासंबंधी व्यक्ती यांच्यात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करून रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सूचना द्यावी. पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस आणि चेकनाके यांच्याशी समन्वय ठेवून शेजारी राज्यातील डुकरांचा अनधिकृत प्रवेश होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हसावद येथील मृत डुकरांचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेतून नुकताच प्राप्त झाला आहे. त्यानुसार त्यांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिवरने झाल्याचं निष्पन्न झालं आहे. डुक्कर पालकांनाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हेही वाचा:
- आई वडिलांना सांभाळा अन्यथा मालमत्ता हातातून जाईल, विभागीय आयुक्तांनी काढले परिपत्रक
- बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' लढत? सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथही तयार, फक्त उमेदवारीची घोषणा बाकी
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना