ठाणे Action Against School Bus : शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. ठाणे परिवहन विभागानं नियमित तपासणी केल्यानं ठाणे शहरामधील 103 स्कूल बस फिट नसल्याचं समोर आलय. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षभरात 2400 बसेसची तपासणी परिवहन विभागानं केली होती. यात योग्य प्रमाणपत्र नसल्यानं 103 बसेसवर कारवाई करण्यात आलीय. अवैधपणे चालणाऱ्या 38 बसेसवर देखील परिवहन विभागानं कारवाई केलीय.
प्रतिक्रिया देताना उपायुक्त रोहित काटकर (ETV BHARAT Reporter)
या नियमांचं झालं नाही पालन : स्कूल बसच्या प्रमाणपत्रांची मुदत संपल्यानंतर ते रिन्यून करणं, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणं, आगीवर नियंत्रण मिळवणारं साहित्य नसणं, मुलींच्या बसेसमध्ये महिला निरीक्षक नसणं, अशा प्रकारच्या कारणांमुळं कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये स्कूल बसेसना 17 लाख 60 हजारांचा दंड देखील आकारण्यात आलेला आहे.
पालकांना परिवहन विभागाचं आवाहन :शालेय बसेसची वाहतूक आता जवळपास सर्वच शाळांमध्ये आहे. त्यामुळं पालकांनी परिवहन विभागाचे एम परिवहन हे ॲपवापरून आपल्या पाल्याची बस योग्य आहे का?, तसंच बसचा विमा आणि फिटनेस आणि इतर सर्व माहिती उपलब्ध आहे का नाही ते तपासण्याचं आवाहन केलंय.
काय आहे एम परिवहन ॲप: आपण बाहेर जाताना वाहनांची कागदपत्रे घेऊन जाणं खूप महत्वाचं असतं. पण कागदपत्रे सोबत न घेतल्यास आपल्याला ट्रॅफिक पोलिस खिशाला कात्री लावू शकतात. अशा परिस्थितीत एम-परिवहन हे ॲप तुम्हाला वाचवू शकते. एम-परिवहन ॲप्लिकेशन हे रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं लॉन्च केलं आहे. याद्वारे नागरिक ऑनलाइन पद्धतीनं याचा वापर करू शकतात. या ॲपमध्ये तुम्हाला जवळ असणारे प्रदूषण तपासणी केंद्र, जवळचे आरटीओ, डीएल मॉक टेस्ट अशा अनेक सुविधा मिळतात.
हेही वाचा -
- ई-चलनद्वारे दंडाची रक्कम भरत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाहीतर होईल बँक अकाऊंट रिकामं
- महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारं 'ते' पत्र फेक; पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ