महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय शिरसाट यांना पुन्हा हुलकावणी : अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी वर्णी - Abdul Sattar New Guardian Minister

Abdul Sattar New Guardian Minister : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद मागील काही दिवसांपासून सुरू होता. संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार संजय सिरसाट यांना मंत्रिपद देऊन पालकमंत्री करण्यात येणार अशा चर्चा करण्यात येत होत्या. मात्र अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली आहे.

Abdul Sattar New Guardian Minister
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 12:20 PM IST

छत्रपती संभाजीनगर Abdul Sattar New Guardian Minister :जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पणन आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पैठणचे आमदार तथा राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकल्यानं त्यांच्याजागी पालकमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असं वाटत असताना अब्दुल सत्तार यांची नियुक्ती निश्चित झाल्यानं सिरसाट यांचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालं आहे. पालकमंत्री नियुक्तीनंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना लाडू-पेढा भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचा जल्लोष (Reporter)

संदीपान भुमरे खासदार झाल्यानं अब्दुल सत्तार यांची वर्णी :पैठणचे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत बंड केलं. शिंदे सरकार स्थापन झाल्यावर त्यांना रोहयो मंत्रीपदासह पालकमंत्री पद देखील मिळालं. अनेक वर्षांनी जिल्ह्याला स्थानिक मंत्री या पदावर मिळाला असल्यानं विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकले. त्यामुळे त्यांच्या जागी कोण असा प्रश्न निर्माण झाला. त्याचवेळी भाजपा आमदार आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांना हा मान द्यावा, अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली. जून महिन्यात लोकसभेचे निकाल लागल्यावर अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली. त्यात आपला एकनाथ शिंदे यांच्याशी प्रासंगिक करार असल्याचं त्यांनी सांगितल्यानं ते नाराज आहेत का? असं वाटत होतं. मात्र अब्दुल सत्तार यांच्या या खेळीनं पालकमंत्री पद त्यांच्या पदरात पडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय शिरसाट यांची इच्छा पुन्हा अपूर्ण :शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर सर्वात आघाडीवर असलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट होते. सरकार स्थापन झाल्यावर मंत्री पद आणि पालकमंत्री पद मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र जिल्ह्यातून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपा तर्फे अतुल सावे यांची वर्णी लागली. नाराज असलेल्या संजय शिरसाट यांना पक्षाचं प्रवक्ते पद देण्यात आलं. संदीपान भुमरे खासदार झाल्यावर आता तरी, मंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
  2. मंत्री अब्दुल सत्तार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील वक्तव्यावरुन मागितली माफी
  3. Sanjay Sirsat संजय शिरसाटांचे शिंदे गटात बंड उद्धव ठाकरेंना संबोधलं कुटुंबप्रमुख

ABOUT THE AUTHOR

...view details