महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री अमावस्या, पौर्णिमेला शेती करायला जातात; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांना गुंडांना भेटाला वेळ आहे, मात्र जनतेला भेटालयाल वेळी नाही. दुसरीकडं पोलीस ठाण्यात आमदारच गोळीबार करताना दिसून येत आहे. तसंच पुण्यात ड्रग्जचं जाळ उघडकीस आलं आहे. त्यामुळं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 5:25 PM IST

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

पुणेAaditya Thackeray :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, अशी आदित्य ठाकरे यांनी टीका केली. गावात रस्ता नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दोन हेलिकॉप्टरनं शेतात जातात, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पर्यावरण नदी बचाव कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आज पुण्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सागर बंगल्यावर आमचा बॉस :"राज्यात खरं सरकार कोणाचं आहे हा मुळं प्रश्न आहे. सत्ताधारी आमदाराच पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालताना दिसतायत. दुसरीकडं अनेक गुंड मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार देखील राज्यातील कायदा सुव्यस्थेकडं दुर्लक्ष करत आहेत," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. "पुण्यात ड्रग्जचं मोठं जाळ उघड झालं आहे. आजच पुण्यातील एक व्हिडिओ समोर आला असून त्यात दोन मुली वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेताना दिसत आहेत. त्यामुळं कायद्याची भीती राहिलेली नाही," असं दिसतंय. "भाजपा आमदार सागर बंगल्यावर आमचा बॉस असल्याचं सांगतो," अशी टीका ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

अमावस्या-पौर्णिमेला मुख्यमंत्री शेतावर :"राज्यात अनेक विकासकामं झाली असून उद्घाटनाअभावी लोकांना त्याचा वापर करता येत नाही, मग ते पुण्यातील विमानतळ असो, मुंबईतील मेट्रो स्थानक असो किंवा मुंबईतील गोखले पूल असेल. मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला रविवारी शेतावर जातात. त्यामुळं त्यांना वेळ नसतो," अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांताक्रूझ येथील पुलाच्या कामाचा फोटो ट्विट केल्याचे सांगितलं. "त्या पुलाचं काम पूर्ण झालं आहे. मात्र त्याचं उद्घाटन झालं नाही. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तसंच दुसऱ्या पुलाचं काम अपूर्ण आहे. असंवैधानिक मुख्यमंत्री उद्घाटनासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत नाही. आजवर अर्धवट पुलाचं उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलं आहे का? काल पौर्णिमा असल्यानं त्यांच्याकडं वेळ नव्हता. अमावस्या आणि पौर्णिमेला ते शेतीवर जातात. हे त्यांच्या आतापर्यंतच्या दौऱ्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाचं उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करायला हवी," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. दिलीप वळसे पाटलांच्या सभेत 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा; वळसे पाटील म्हणाले...
  2. पंतप्रधान मोदींना मेळघाटची भुरळ; 'मन की बात'मध्ये चंद्रपुरातील वाघांचाही केला उल्लेख
  3. भाजपाच्या दोन खासदारांमधील वैर शमलं? सतरा वर्षानंतर घेतला दोघांनी एकत्र 'चहा'

ABOUT THE AUTHOR

...view details