महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून, शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक - Bhiwandi Rape News - BHIWANDI RAPE NEWS

Bhiwandi Crime : भिवंडी शहरात एका चाळीत राहणाऱ्या एका 9 वर्षीय चिमुरडीला खाऊचं आमिष दाखवून तिच्यावर आरोपीनं अत्याचार केले. त्यानंतर तिची धारदार वस्तूनं वार करून निर्घृण हत्या केली.

Bhiwandi News
Bhiwandi News (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 1:26 PM IST

ठाणे Bhiwandi Crime :शेजारी राहणाऱ्या एका नराधमानं नऊ वर्षाच्या चिमुरडीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील दोन मजली चाळीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकानं फरार झालेल्या नराधम आरोपीला अटक केली आहे. अभय यादव (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचं नाव आहे.

खाऊचं आमिष दाखवून खोलीत बोलावलं : पोलिंसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक पीडित चिमुरडी भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील एका दुमजली चाळीत कुटुंबासह राहत होती. आई-वडील दोन मोठ्या बहिणी, एक भाऊ आणि पीडित चिमुरडी असं कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास आहे. चिमुरडीचे वडील आणि आई बाहेर कंपनीत काम करतात. आई आपल्या दोन्ही मोठ्या मुलींनासुद्धा सोबत कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. गुरुवारी हे कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले. तर मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्या सुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमानं पीडित चिमुरडीस खाऊचं आमिष दाखविलं. तिला आपल्या खोलीत बोलावलं. खाऊच्या बहाण्यानं बोलावून तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूनं वार केले. तिची निर्घृण हत्या केली.

मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला :सायंकाळी शाळेतून मृतक मुलीचा भाऊ घरी आला. तेव्हा खोलीला कुलूप बघून त्यानं बहिणीला शोधलं. पण ती सापडली नाही. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तेव्हा परिसरातील एका छोट्या मुलानं पीडित मुलीला ती राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाताना बघितल्याचं सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता एका खोलीत पीडितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. हे दृश्य पाहिल्यावर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

नराधमाला ठोकल्या बेड्या :या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात पाठवला. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा भारतीय न्याय संहितेमधील कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

  1. ठाण्यात श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, 1 जुलैपासून कायद्यात केलेल्या बदलामुळं प्राणी प्रेमी नाराज - Unnatural abuse on a dog
  2. घोडा गाडी शर्यतीत झाला वाद: डोक्यात दगड घालून युवकाला संपवलं, 'तिकडी' अटकेत - Youth Murder In Kolhapur
  3. ठाण्यात बालकावर नराधमाचा अनैसर्गिक अत्याचार; न्यायालयानं ठोठावली 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Minor Boy Rape In Thane

ABOUT THE AUTHOR

...view details