जळगाव Indian Students Drown In Russian River : रशियात शिकणाऱ्या जिल्ह्यातील तीन तरुणांचा वोल्खोव्ह नदी किनाऱ्यावर शहरात समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे विद्यार्थी रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. नदी किनाऱ्यावर फिरत असताना त्यांचा वाहत गेल्यानं मृत्यू झाला. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव ( आयएफएस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करुन दिला आहे.
समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यानंतर बुडाले विद्यार्थी :प्राथमिक माहिती नुसार हर्षल अनंतराव देसले ( भडगाव ), झिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी ( अंमळनेर ) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघं आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी ही अनपेक्षित घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहेत.