महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2014 नंतर भारतात बॉम्बस्फोट घडवण्याची कुणाची हिंमत नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं - DEVENDRA FADANVIS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहिदांना विनम्र अभिवादन केले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 2:45 PM IST

मुंबई-26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या निमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहिदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना भेटून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आधार दिलाय.

शहिदांना नमन करण्याचा आजचा दिवस : या प्रसंगी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 26/11 हा दिवस दोन गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी आपणाला संविधान मिळालं होतं म्हणून आजच्या दिवसाला आपण संविधान दिवस म्हणतो. तसेच या संविधानाच्या दिवशी 2008 साली आमच्या संविधानावर आणि स्वातंत्र्यावर काही मूठभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश हादरवून टाकला. शेकडो निष्पाप लोकांना बॉम्बस्फोट अन् गोळीबारात मारून टाकण्याचं काम केलं. अनेक लोक घायाळ झाले. अशा परिस्थितीमध्ये आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवलं. करकरे, कामटे, साळसकर यांसारखे शूर अधिकारी शहीद झाले. तुकाराम ओंबळेंसारख्या व्यक्तीने अक्षरशः गोळ्या खात हातामध्ये काठी असूनही बंदूक हातामध्ये घेतलेल्या कसाबला पकडलं आणि त्यात ते स्वतः शहीद झाले. 26/11 चे जे शहीद जवान आहेत, त्या सर्वांना नमन करण्याचा आजचा दिवस असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

भारत हा एक मजबूत देश :फडणवीस पुढे म्हणाले की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणा सर्वांनी निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे. मुंबईमध्ये किंवा आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही. खरं तर मुंबईवर झालेला हा हल्ला नव्हता तर देशाची आर्थिक राजधानी ही उद्ध्वस्त करून जगात भारताला आम्ही झुकवू शकतो, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आमच्या शूर पोलिसांनी तो हल्ला परतवून लावला आणि भारत हा एक मजबूत देश आहे, असा संदेश दिला. आज आपण पाहतो की 2014 नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत कोणी करू शकला नाही, अशा पद्धतीची ताकद भारताने उभी केलीय. जोपर्यंत आपल्या मनामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना तयार होत नाही. जोपर्यंत देशाकरिता आपण जगण्याचा विचार करणार नाही. तोपर्यंत ही भावना तयार होत नाही. आमचा परिवार, समाज महत्त्वाचा आहे. पण त्याहीपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच जगातील सर्वात मजबूत राष्ट्र म्हणून आपली जी संकल्पना आहे, ती पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या देशासाठी आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा विचार निश्चितपणे आपण सर्व करू शकतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details