महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 1:19 PM IST

ETV Bharat / state

दिल्लीतून लंडनला विमानाने गेले तब्बल 140 किलो मेफेड्रोन; पुणे पोलिसांच्या तपासात माहिती उघड

MD Drugs Seized : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई‎ केलीय. दिल्ली येथून डेल्टा कुरिअरच्या माध्यमातून लंडनला 140 किलो ड्रग्ज पुरवठा केल्याची माहिती समोर आलीय.

MD Drugs Seized
एमडी ड्रग

पुणे MD Drugs Seized: 'ड्रग्ज मुक्त अभियान' पुणे पोलिसांनी हाती घेतलं आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात पुणे, सांगली आणि दिल्ली येथे मोठी कारवाई केलीय. जवळपास 3600 हून अधिक कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केलाय. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत 8 जणांना अटक केलीय. दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडं तपास केला असता, डेल्टा कुरिअरच्या माध्यमातून लंडनला 140 किलो ड्रग्ज पुरवठा करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत उघडकीस आलंय.


15 ते 20 बॅरलमध्ये एमडी ड्रग: कुरकुंभ एमआयडीसी याठिकाणी जून 2023 पासून आरोपींनी ड्रग्जचं उत्पादन सुरू केलं होतं. संबंधित कंपनीतून छोट्या टेम्पोमध्ये 25 किलोच्या वेगवेगळ्या 15 ते 20 बॅरलमध्ये एमडी ड्रग्ज भरून दिल्लीला नेण्यात येत होतं. दिल्ली या ठिकाणी संदीप यादव या आरोपीची डेल्टा कुरिअर कंपनी कार्यरत आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून संदीप यादव वेगवेगळ्या देशांमध्ये फूड पॅकेटची कुरियर सेवा देतो.

अन्नपदार्थ पॅकिंगमध्ये एमडी ड्रग्ज : डेल्टा कुरिअर कंपनीचा गैरवापर करून फरार आरोपी वीरेन सिंग याच्या मार्गदर्शनाखाली फूड पॅकेटमध्ये ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून त्यात एमडी ड्रग्ज ठेवलं आणि त्याच्या वरील आणि खालील बाजूस अन्नपदार्थ ठेवून आंतरराष्ट्रीय दर्जाचं पॅकिंग तयार केलं. विमानतळावर कार्गो तपासणीसाठी संबंधित माल गेल्यानंतर मोठ्या स्कॅनरमध्ये अन्नपदार्थांमध्ये एमडी ड्रग्ज हे दिसून येत नव्हतं. त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी मोठ्या प्रमाणात लंडनला ड्रग्ज पाठवल्याचं निष्पन्न झालंय. या गुन्ह्यातील परदेशात फरार झालेला मुख्य आरोपी संदीप धुनिया याने तेथील एजंटांशी संपर्क करत पुरवठा केला होता.

कुरिअरच्या माध्यमातून लंडनला पाठवले ड्रग्ज :पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत पुणे, सांगली आणि दिल्ली येथे कारवाई करत जवळपास 3600 हून अधिक कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केलंय. पुणे पोलिसांकडून दिल्ली येथे जी कारवाई करण्यात आली त्यात 970 किलो एमडी जप्त करण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त
  2. पुणे ड्रग्स प्रकरणाचं आढळलं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, कुरिअर कंपनीद्वारे 'या' शहरात जाणार होते अमली पदार्थ
  3. अमली पदार्थांच्या तस्करीत पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई, 1100 कोटींचे 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details