राजकोट Yashasvi Jaiwal Double Century : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं राजकोट इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात नाबाद द्विशती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याचं हे सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा जागतिक विक्रमाची बरोबरी केलीय. त्यानं पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या 28 वेर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केलीय. भारतीय संघाकडून एका डावात सर्वाधिक षटाकर मारण्याचा विक्रम यापुर्वी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर होता. हा विक्रमही जैस्वालनं मोडलाय. त्यानं आपल्या विक्रमी द्विशतकी खेळीत एका डावात 12 षटकार मारले असून तो अद्यापही नाबाद आहे. यापुर्वी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी 8 षटकार मारण्याचा विक्रम होता.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :
- यशस्वी जैस्वाल (भारत) 12 षटकार विरुद्ध इंग्लंड 2024
- वसीम अक्रम (पाकिस्तान) 12 षटकार विरुद्ध झिम्बॉब्वे 1996
- मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) 11 षटकार विरुद्ध झिम्बॉब्वे 2003
- नाथन एसले (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध इंग्लंड 2002
- ब्रॅंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध पाकिस्तान 2014
- ब्रॅंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध श्रीलंका 2014
- बेन स्टोक्स (इंग्लंड) 11 षटकार विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2016
- कुशल मेंडिस (श्रीलंका) 11 षटकार विरुद्ध आर्यलंड 2023
मालिकेत जैस्वालचा बोलबाला : यापुर्वी 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूनं 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालनं 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत एका डावात फलंदाजी करताना 8 षटकार ठोकले होते. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत जैस्वालने या मालिकेत 20 हून अधिक षटकार मारले असून, यासह तो कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही बनला असून या मालिकेत अद्याप दोन सामने शिल्लक आहेत.