महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वाह रे पठ्ठ्या..! यशस्वी जैस्वालनं डावाच्या पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय टी 20 इतिहासातील पहिलाच खेळाडू - Yashwai Jaiswal Record

Yashwai Jaiswal : झिम्बाब्वेविरुद्धच्या 5व्या टी 20 सामन्यांत यशस्वी जैस्वाल केवळ 12 धावा करुन बाद झाला असला तरी त्यानं इतिहास रचला. त्यानं सिकंदर रझाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारुन डावाची सुरुवात केली.

Yashwai Jaiswal
यशस्वी जैस्वाल (BCCI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 7:22 PM IST

हरारे Yashwai Jaiswal : झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. मालिकेतील अंतिम आणि पाचवा सामना आज म्हणजेच 14 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब इथं झाला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनं इतिहास रचला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर 12 धावा करणारा तो आंतरराष्ट्रीय टी 20 इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

यशस्वी जैस्वालनं इतिहास रचला : स्फोटक भारतीय सलामीवीर 22 वर्षीय यशस्वी जैस्वालनं एक मोठा विक्रम केला आहे. टी 20 आतरराष्ट्रीयमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझानं पहिलं षटक टाकालं. डावाचा पहिलाच चेंडू रझानं नो बॉल टाकला. जैस्वालनं या चेंडूवर षटकार मारला. या चेंडूवर 7 धावा आल्या. यानंतर जैस्वालनं पहिल्या अधिकृत चेंडूवरही षटकार ठोकला. अशा प्रकारे, त्यानं टी 20 आतरराष्ट्रीयमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर 12 धावा केल्या. तर संघाच्या एकूण 13 धावा झाल्या.

आयपीएलमध्येही केला हा पराक्रम : जैस्वालनं सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएलमध्येही त्यानं हा कारनामा केला आहे. 2023 साली ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात त्यानं नितीश राणाच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. विराट कोहलीसोबत ही कामगिरी करणारा जैस्वाल हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर भारताच्या 13 धावांनी अधिकृत चेंडूवर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचला. भारतानं 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानचा (10) विक्रम मोडला.

हेही वाचा :

  1. शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी; पॉवरप्लेमध्ये बसले तीन धक्के - ZIM vs IND 5th T20I
  2. ऋषभ पंतच्या दिल्लीत मोठा फेरबदल; आगामी आयपीएलपुर्वी दिग्गजानं तोडलं संघासोबत नात - Ricky Ponting
  3. बीसीसीआयनं अचानक बदललं श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक; आता 'या' तारखेपासून भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर युगा'ला होणार सुरुवात - India vs Sri Lanka Series

ABOUT THE AUTHOR

...view details