महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण? - WHO IS SMRITI MANDHANAS BOYFRIEND

भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Smriti Mandhana's Boyfriend
स्मृती मंधान (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 4, 2024, 7:16 PM IST

मुंबई Smriti Mandhana's Boyfriend :भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना म्हणजे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. नुकतीच स्मृती महिला वनडेत सर्वाधिक शतकं झळकावणारी भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीचे चौकार षटकार जेवढे सुरेख असतात, तितकीच ती सुंदरही दिसते. केवळ भारतातच नाहीतर, संपूर्ण जगभरात स्मृतीचे चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया हॅडल्सवर चाहत्यांकडून नेहमीच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो. पण, स्मृतीच्या लाखो चाहत्यांचं हार्टब्रेक तेव्हा झालं, जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडबाबत त्यांना कळालं. सध्या चाहते तिच्या बॉयफ्रेंडबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

कोण आहे स्मृतीचा प्रियकर आणि तो काय करतो : खरंतर, महिलांच्या वनडेत सर्वाधिक शतकं झळकावणारी स्मृती भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. यामुळं सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात तिचा प्रियकर पलाश मुच्छाल याच्या नावाचाही समावेश आहे. 29 वर्षीय पलाश मुच्छाल, जो 27 वर्षीय क्रिकेटर स्मृती मंधानाला डेट करत आहे, तो एक भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे, ज्यानं अनेक बॉलीवूड गाणी संगीतबद्ध केली आहेत. दोघांच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे. त्याची मोठी बहीण पलक मुच्छाल ही एक बॉलीवूड गायिका आहे, जिनं सलमान खानपासून हृतिक रोशनपर्यंतच्या चित्रपटांमधील गाण्यांना आवाज दिला आहे. संगीत देण्यासोबतच पलाश मुच्छाल हा चित्रपट दिग्दर्शकही आहेत. 2024 मध्ये, त्याचा चित्रपट काम चालू है ओटीटी वर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये राजपाल यादव आणि जिया मानेक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. याला झी5 वरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

स्मृतीनं रचला होता इतिहास : स्मृती मंधानाबद्दल सांगायचं तर, नुकतंच अहमदाबाद इथं झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंड महिला संघाचा 6 गडी राखून पराभव करुन मालिका 2-1 अशी जिंकली. स्मृती मंधानानं या सामन्यात भारतासाठी शतक झळकावलं आणि यासाठी तिची सामनावीर म्हणून निवड झाली. हे तिचं ODI मधील 8 वं शतक होतं आणि यामुळं तिच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.

हेही वाचा :

  1. आकाश दीपच्या नावावर फलंदाजीत अनोखा विक्रम... 147 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' कोणालाच जमलं नाही
  2. क्रिकेटमध्ये रोहित-विराट युग संपलं...? आकडेवारी पाहा अन् तुम्हीच ठरवा

ABOUT THE AUTHOR

...view details